उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर

उद्धव ठाकरे आजपासून विदर्भ, मराठवाडा दौर्‍यावर

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : राज्याचा दौरा करणारे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज, गुरुवारपासून बुलडाणा आणि हिंगोली या जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत. या दौर्‍यात दोन दिवसांत ते सात जनसंवाद सभा घेतील, असे पक्षातर्फे सांगण्यात आले.

संबंधित बातम्या 

गुरुवारी बुलडाणा दौर्‍यात ते चिखली, मोताळा आणि जळगाव-जामोद येथे जनसंवाद सभा घेणार आहेत, तर शुक्रवारी बुलडाणा-हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा दौरा करणार आहेत. यावेळी ते खामगाव, मेहकर, सेनगाव आणि कळमनुरी येथे शिवसैनिकांशी संवाद साधणार आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news