U-19 Team India: ‘जगज्जेत्या’ मुलींचा सचिन तेंडुलकरच्या हस्ते सत्कार

U-19 Team India: ‘जगज्जेत्या’ मुलींचा सचिन तेंडुलकरच्या हस्ते सत्कार
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : U-19 Team India : विश्वचषक विजेत्या अंडर 19 भारतीय महिला संघाचा सचिन तेंडुलकरच्या हस्ते आज (दि.1) सत्कार होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर या कार्यक्रमाचे आयोजन केले असून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील अंतिम टी-20 सामन्यापूर्वी जगज्जेत्या मुलींचा गौरव केला जाणार आहे.

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी सोमवारी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, 'भारतरत्न सचिन तेंडुलकर आणि बीसीसीआयचे पदाधिकारी 1 फेब्रुवारी रोजी नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी साडेसहा वाजता अंडर 19 भारतीय महिला संघाचा सत्कार करतील. ही अत्यंत आनंदाची बाब आहे. युवा क्रिकेटपटूंनी भारतासाठी गौरवास्पद कामगिरी केली आहे. आम्ही त्यांच्या खेळाचा गौरव करणार आहोत.'

दरम्यान, बीसीसीआयने जगज्जेता अंडर 19 महिला क्रिकेट संघ आणि सपोर्ट स्टाफला पाच कोटी रुपयांचे बक्षीसही जाहीर केले आहे. रविवारी पॉचेफस्ट्रुममध्ये शेफाली वर्माच्या नेतृत्वाखालील संघाने भारतीय संघाने शानदार क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजीच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर इंग्लंडला अवघ्या 68 धावांत गुंडाळले. त्यानंतर टीम इंडियाच्या मुलींनी यशस्वीरित्या विजयी लक्ष्य तीन गडी गमावून सहज गाठले. याचबरोबर हा सामना सात गडी राखून जिंकून विश्वचषकावर भारताचे नाव कोरले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news