Mental illness : माणसाची स्थिती कठीण करतात ‘या’ मानसिक व्याधी, जाणून घ्या कोणत्या?

Mental illness
Mental illness

माणसाला शारीरिक व्याधींबरोबरच अनेक मानसिक व्याधीही होत असतात. शारीरिक व्याधींवर उपचार करणे काही वेळा सोपे जाते. मानसिक व्याधीवर योग्य उपचार न झाल्यास त्या माणसाची स्थिती कठीण होऊन बसते. मानसिक व्याधी वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत. ( Mental illness ) 

संबंधित बातम्या 

वैफल्य (डिप्रेशन)

मानसिक व्याधींमध्ये सर्वाधिक प्रमाणात आढळून येणारी व्याधी म्हणजे वैफल्य. माणसाला अनेक कारणांमुळे वैफल्य येते. पराकोटीची निराशा मनात तयार होण्याने वैफल्य येते. करिअरमध्ये सतत येणारे अपयश, व्यवसाय-धंद्यात झालेले नुकसान, नोकरीमध्ये अपेक्षित पद न मिळणे, कोटुंबिक समस्या, प्रेमभंग अशा अनेक कारणांमुळे माणसाला वैफल्य येते. वैफल्य आल्यावर त्याचा परिणाम माणसाच्या शरीरावर, विचारांवर आणि मूडवर होत असतो. या व्याधीच्या अनेक परिणामांमुळे माणसाचे दैनंदिन जीवनाचे चक्र पूर्णतः बिघडून जाते. अशा माणसाला काहीच करावेसे वाटत नाही. आपल्या जीवनात काही अर्थ नाही, असे वाटू लागते. अशी व्याधी झालेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना त्याचे फटके सहन करावे लागतात.

सायक्लोथिमिया

सायक्लोथिमिया या व्याधीमध्ये माणसाचा मूड स्विंग होतो. म्हणजे अचानक व्यवस्थित बोलणारा माणूस गप्प होऊन जातो. तो स्वतःला समाजापासून दूर ठेवू लागतो. ही व्याधी का उत्पन्न होते, याविषयी बरेच संशोधन झाले आहे; मात्र त्याची निश्चित कारणे शोधण्यात संशोधकांना अजून यश आलेले नाही. ही व्याधी आनुवंशिक कारणामुळे होत असावी, असा संशय आहे. स्त्री आणि पुरुष या दोघांमध्ये सारख्याच प्रमाणात ही व्याधी आढळून येते.

लेक्टोमेनिया

ही व्याधी जरा विचित्र स्वरूपाची आहे. या व्याधीमध्ये रुग्ण वस्तू अथवा पैशाच्या चोर्‍या करू लागतो. आपण दुसर्‍याच्या वस्तूंची, पैशांची चोरी करत आहोत, याचे भान त्याला नसते. कालांतराने त्याला आपण काय करून बसलो आहोत, हे कळते. ही व्याधी होणार्‍या व्यक्तींचे प्रमाण कमी असते; मात्र या व्याधीवर उपचार करणे डॉक्टरांच्या द़ृष्टीने मोठे आव्हान असते. चोरी करण्यापूर्वी आणि चोरी केल्यानंतर त्या व्यक्तीच्या मनावर प्रचंड दडपण येते. या दडपणाचा सामना कसा करावा, हे कळेनासे होते.

पायरोमानिया

पायरोमानिया ही व्याधी आपल्या मानसिक संतुलनात बिघाड झाल्यामुळे निर्माण होते. लहान मुले तसेच पंधरा वर्षांपर्यंतची मुले यांच्यामध्ये या व्याधीचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. ही व्याधी झालेल्या रुग्णांवर मानसोपचार करावे लागतात.

स्लिप पॅरेलिसिस

या व्याधीमध्ये माणसाला वारंवार झोप येते किंवा त्याला अजिबात झोप येत नाही. काही काळ त्याला आपले शरीर संपूर्णपणे लुळे पडले आहे, अशी भावना निर्माण होते.

ट्रिकोटिलोमानिया

ही व्याधी फार कमी प्रमाणात आढळून येते. ही व्याधी झालेले रुग्ण आपले केस उपटू लागतात. केस उपटतात आणि काही-काही वेळा ते खाऊनही टाकतात, अशी विचित्र प्रकारची ही व्याधी आहे. या व्याधीवर उपचार करणे डॉक्टरांच्या द़ृष्टीने कठीण काम असते. वेगवेगळ्या कारणांमुळे मनावर सतत ताण आल्यास त्यातून ही व्याधी उद्भवते. ( Mental illness ) 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news