यवतमाळ : दुर्गा देवी विसर्जन मिरवणुकीत दोन युवकांवर चाकू हल्ला

file photo
file photo
Published on
Updated on

यवतमाळ; पुढारी वृत्तसेवा : शहरातील दुर्गा मंडळाने मंगळवारी ( दि. ३) रोजी दुपारपासून मातेच्या विसर्जनाला सुरुवात केली आहे. भव्य अशा मिरवणुका काढल्या जात आहेत. या मिरवणुकीदरम्यान वाद झाला आणि आठवडी बाजार येथे एका युवकावर चाकू हल्ला करण्यात आला. त्यानंतर त्याचदिवशी रात्री साडेनऊ वाजता वाणीपुरा येथे युवकाला चाकूने भोसकले. या दोन्ही घटनेतील एका युवकाची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

प्रवीण यशवंत केराम (वय २४, रा. तलाव फैल) असे गंभीर जखमी युवकाचे नाव आहे. पहिल्या घटनेतील जखमी पत्या नावाच्या युवकांची प्रकृती स्थिर आसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेनंतर पोलिसांनी विसर्जन मिरवणुकीतील बँड, डिजे बंद करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.

पोलिसांनी रात्री १० नंतरच्या सर्वच ठिकाणचे बँड पथक जबरदस्तीने बंद करायला लावले. यावरून काही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसोबत वाद घातला. या भागात पहिल्यांदाच विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागण्याचा प्रकार घडला आहे. पुढील ९ सप्टेंबरपर्यंत दुर्गा देवीचे विसर्जन चालणार आहे. पुढच्या काही दिवसात शहरात आणखी पोलीस बंदोबस्त वाढविण्याची शक्यता आहे.

हेही वाचलंत का? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news