पुणे : मॉर्निंग वॉक बेतला जिवावर ! दोन महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

पुणे : मॉर्निंग वॉक बेतला जिवावर ! दोन महिलांचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

जंक्शनः पुढारी वृत्तसेवाः बारामती-इंदापूर पालखी महामार्गावर जंक्शन( ता इंदापूर )येथे मार्निंग वॉक साठी गेलेल्या दोन महिलांना अज्ञात वाहनांने धडक दिल्याने दोघींचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी( दि २२) सकाळी घडली. अपघातामध्ये अर्चना श्रीशैल सनमठ व अनिता शिवाजी शिंदे (रा.दोघी, आनंदनगर) यांचा मृत्यू झाला. जंक्शन,आनंदनगर,लासुर्ण परिसरातील अनेक नागरिक सकाळी मार्निंग वाॅक साठी बारामती-इंदापूर व जंक्शन – वालचंदनगर रस्त्याने सकाळी व संध्याकाळी फिरत असतात.

संत तुकाराम महाराज पालखी मार्गाचे बारामती ते इंदापूर दरम्यानच्या काम सुरु आहे. रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूक अडथळे येत आहेत. जंक्शन चौकामध्ये ही काम सुरु असून काम करणारी अवजड वाहनेही भरधाव वेगाने रस्त्याने ये -जा करीत आहेत. आज बुधवारी सकाळी सातच्या सुमारास अर्चना सनमठ व अनिता शिंदे या दोघी पोलिस  ठाण्याजवळून बारामती-इंदापूर राज्यमार्गाच्या सर्व्हिस रोडने मार्निंग वॉक करीत असताना भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात अजवड वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने अर्चना सनमठ यांचा जागीच मृत्यू झाला तर अनिता शिंदे जखमी झाल्या. दवाखान्यामध्ये उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला.अपघातानंतर वालचंदगर पोलिसांनी ताताडीने अवजड वाहनाचा तपास करण्याचे काम सुरु केले. अधिक तपास वालचंदनगर पोलिस ठाण्याचे साहय्यक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे करीत आहेत.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news