Goa News : जम्मू काश्मिरच्या दोन पर्यटकांचा गोव्यात बुडून मृत्यू

Goa News : जम्मू काश्मिरच्या दोन पर्यटकांचा गोव्यात बुडून मृत्यू
Published on
Updated on

हरमल येथील स्वीट लेकजवळ समुद्रात जम्मू काश्मिरच्या दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. १८ ) रोजी सकाळी घडली आहे. अमन ( वय २८) आणि अभिषेक (वय ३४) अशी मृत्यू झालेल्याची नावे असून हे दोघेजण सख्खे भाऊ आहेत. ( Goa News )

संबधित बातम्या 

जम्मू काश्मीर आणि हिमाचल प्रदेशचे चार पर्यटक रविवारी गोव्यात आले होते. यातील अभिषेक याचे लग्न ठरले होते. यानिमितत्ताने काही मित्र पार्टीसाठी गोव्यात आले होते. ते कळंगुटमध्ये उतरले होते.

बुधवारी (दि. १८) रोजी सकाळी ६. ३० वाजण्याच्या सुमारास अभिषेक व अमन स्वीट लेक तळ्याजवळ समुद्रात आंघोळीसाठी गेले होते. दरम्यान दोघांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बचाव पथकाने तत्काळ घटनास्थळी पोहोचून शोधकार्य जारी केले आहे. तब्बल दोन तास शोधकार्य करून दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. ( Goa News )

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news