पुण्यातील दोन संशयित रुग्णांचा मृत्यू ’एच 3 एन 2’मुळेच

पुण्यातील दोन संशयित रुग्णांचा मृत्यू ’एच 3 एन 2’मुळेच

पुणे; पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील दोन 'एच 3 एन 2'बाधित संशयित रुग्णांच्या मृत्यूचे अहवाल प्रलंबित होते. दोन्ही अहवाल महापालिकेला प्राप्त झाले असून, रुग्णांचा मृत्यू 'एच 3 एन 2'च्या संसर्गामुळेच झाले असल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. एक रुग्ण 15 मार्च, तर दुसरा 23 मार्च रोजी दगावला होता. डॉ. नायडू सांसर्गिक रुग्णालयाच्या निगराणी युनिटमधील सहायक आरोग्य अधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली मृत्यू अन्वेषण समितीमधील सभासदांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मृत्यूच्या अहवालांचे विश्लेषण करण्यात आले. दोन्ही रुग्णांना 'एच 3 एन 2'ची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.

महापालिकेतील सहायक आरोग्य अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुधीर पाटसुते, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक डॉ. नरेश सोनकवडे आणि डॉ. एच. बी. प्रसाद, डॉ. नायडू रुग्णालयातील छातीरोगतज्ज्ञ डॉ. कार्तिक जोशी, नोबल रुग्णालयातील फिजिशियन डॉ. राज कोद्रे, सूर्यसह्याद्री रुग्णालयतील फिजिशियन डॉ. सुजाता गायकवाड आणि डॉ. महेश कुमार यांचा समितीत समावेश आहे.

दोन्ही रुग्णांना सहव्याधी असल्याचे स्पष्ट झाले होते.
इन्फ्लुएन्झा विषाणूच्या 'एच 3 एन 2' या उपप्रकाराची लागण झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मृत्यूचे प्रलंबित अहवाल प्राप्त झाल्यावर त्यांचा मृत्यू 'एच 3 एन 2'मुळे झाल्याचे निष्पन्न झाले आहे.
डॉ. सूर्यकांत देवकर, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे महापालिका

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news