पुढारी ऑनलाईन डेस्क : इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनच्या हमास यांच्यात शनिवारी सकाळपासून रक्तरंजित संघर्ष सुरु असतानाच इजिप्तमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. इजिप्तच्या अलेक्झांड्रिया शहरातील आज ( दि. ८) एका पोलिस अधिकाऱ्याने दोन इस्रायली पर्यटकांची ( Israeli tourists )गोळ्या झाडून हत्या केली. या गोळीबारात एक इजिप्तचा नागरिकही ठार झाला आहे.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, अलेक्झांड्रिया शहरात इस्रायली पर्यटक आणि पोलीस अधिकार्याचा वाद झाला. त्यावेळी पोलिस अधिकार्याने केलेल्या गोळीबारात दोन इस्रायली पर्यटकांसह एक स्थानिक नागरिक जागीच ठार झाला. सुरक्षा दलांनी परिसराची नाकेबंदी केली असून संशयित हल्लेखोराला ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर या घटनेनंतरचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये रुग्णवाहिका जखमींना नेताना दिसत आहेत.