पुढारी ऑनलाईन डेस्क : झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधान सदस्यत्व धोक्यात आले आहे. कोळसा खाण घोटाळा प्रकरणी त्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांना केली आहे. यामुळे आता झारखंडमधील सत्तासंघर्ष तीव्र झाला आहे. महाआघाडीमधील आमदारांमधील फूट टाळण्यासाठी आता महाआघाडीच्या आमदारांना आज दोन बसने छत्तीसगडला रवाना झाले. आज मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या निवासस्थांनी महाआघाडी सरकारमधील आमदारांची बैठक झाली. यानंतर त्यांना छत्तीसगड किंवा पश्चिम बंगालमध्ये हलविण्यासाठी हालचाली गतीमान झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
झारखंडमध्ये झारखंड मुक्ती माेर्चा ( जीएमएम ) , काँग्रेस, राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. मीडिया रिपोर्टनुसार , छत्तीसगडची राजधानी रायपूरमधील एका हॉटेलच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. याचा हॉटेलमध्ये महाआघाडीच्या आमदारांना ठेवण्यात येणार आहे. दरम्यान, काँग्रेसने सर्व आमदारांनी बैठक बोलवी असून या बैठकीचे अध्यक्षस्थानी पक्षाचे प्रभारी अविनाश पांडे असतील.
कोळसा खाण भाडेपट्टीवर देण्याप्रकरणी अडचणीत आलेल्या मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे विधान सदस्यत्व रद्द करण्यात यावे, अशी शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांना केली आहे. आता आज राज्यपाल रमेश बैस याबाबत निर्णय घेण्याची शक्यात आहे.
झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर मुख्यमंत्री पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. मुख्यमंत्री असतानाही त्यांच्या नावावर कोळसा खाण भाडेपट्टीवर देण्याबाबत त्यांनी लाभाच्या पदाचा फायदा घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करावे का, याबाबत राज्यपालांनी निवडणूक आयोगाकडे मार्गदर्शन मावले होते. गुरुवार निवडणूक आयोगाने आज आपला अहवाल सादर केला होता.
विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यास हेमंत सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागेल. राज्यात नवे सरकार स्थापन होईल. हेमंत सोरेन यांचा पक्षा झारखंड मुक्ती मोर्चा (जीएमएम) पक्षाचे आमदार नवीन नेत्याची निवड करतील. झारखंडमध्ये जीएमएम, काँग्रेस, राजद आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या आघाडीचे सरकार आहे. त्यामुळे जीएमएमला नेत्याची निवड करताना सर्व मित्रपक्षांशी चर्चा करावी लागणार आहे.
काही दिवसांपूर्वी भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी हेमंत सोरेने हे आपली पत्नी कल्पना सोरेन यांना मुख्यमंत्री करतील, असे सूचक विधान केले होते. सोरेन यांचे पिता व शिबू सोरेन त्यांच्यावर विविध खटले सुरु आहेत. तसेच त्यांच्या उपचारही सुरु आहेत. त्यामुळे जर सोरेन यांचे विधानसभा सदस्यत्व रद्द झाल्यास त्यांच्या पत्नी कल्पना सोरेने मुख्यमंत्री होतील, असे मानले जात आहे. मात्र या निर्णयासाठी पक्षातील आमदारांचे एकमत होणे आवश्यक आहे. अशीही चर्चा आहे की, कल्पना यांची मुख्यमंत्रीपदी निवड केल्यास पक्षातील ज्येष्ठ नेत्यांची नाराजी सोरेन यांना सहन करावी लागणार आहे. तसेच कल्पना सोरेन यांचे नाव जमनी खरेदी घोटाळात असून विरोधी पक्षही त्याच मुद्दावरुन त्यांना आक्रमक होवू शकतात, असे मानले जात आहे.
सोरेन मंत्रीमंडळातील दोन नावेही मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीमध्ये आहेत. यामध्ये झारखंडचे परिवहन मंत्री चंपई सोरेन आणि महिाला व बाल विकास मंत्री जोबा मांझी यांची नावे आघाडीवर आहेत. हे दोन्ही नेते हेमंत सोरेन यांचे निकटवर्ती मानले जातात. त्यांना संधी मिळेल, अशीही चर्चा आहे.