महेंद्र सिंह धोनी याच्या अकाउंटची ब्लू टिक twitter ने हटवली

महेंद्र सिंह धोनी याच्या अकाउंटची ब्लू टिक twitter ने हटवली
Published on
Updated on

twitter  : महेंद्र सिंह धोनी भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार, दोन वर्ल्डकप विजेत्या संघाचे नेतृत्व, आयपीएलमधील तीन टायटल नावावर. असे असले तरी ट्विटरने एमएस धोनीच्या ट्विटर अकाऊंटची ब्लू टिक काढून घेतली आहे. त्यानंतर ट्विटवर #MS Dhoni असा ब्लू टिकबाबत ट्रेंड सुरु झाला. अखेर एका वृत्तसंस्थेने माहिती दिली की ट्विटरने महेंद्र सिंह धोनीच्या ट्विटर अकाऊंचे ब्लू टिक लेबल परत लावले आहे.

ट्विटरने शनिवारी एमहेद्र सिंह धोनी याच्या ( MS Dhoni ) twitter अकाऊंटची ब्लू टिक हटवली होती. ट्विटर जे अकाऊंट व्हेरिफाईड असते त्यालाच ब्लू टिक मार्क देते. धोनी हा सोशल मीडियावर फारसा अॅक्टिव्ह नसतो. त्याला सोशल मीडियावर लाखो लोक फॉलो करत असले तरी त्याने आपल्या अकाऊंटवरून फारच कमी पोस्ट शेअर केल्या आहेत.

धोनीचे सोशलवर लाखो फॉलोअर्स

महेंद्र सिंह धोनी याचे ( MS Dhoni ) ट्विटरवर ८० लाखाच्यावर फॉलोअर्स आहेत. तर २ कोटीच्या वर फेसबुकवर आणि ३ कोटी ४० लाखाच्यावर इन्स्टाग्रामवर फॉलोअर्स आहेत. पण, भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज या आयपीएलमधील सर्वात चर्चेत असणाऱ्या संघाचा कर्णधार असूनही त्याने या सोशल अकाऊंटवरून नाममात्र पोस्ट शेअर केल्या आहेत. त्यामुळेत ट्विटरने त्याची ब्लू टिक हटवली असण्याची शक्यता आहे.

धोनीने आपले शेवटचे ट्विट या वर्षी ८ जानेवारीला केले होते. तीच पोस्ट त्याने इन्स्टाग्रामवरही केली होती. फेसबूकवर तो ३० एप्रिलला शेवटचा अॅक्टिव्ह होता.

माहीचे दर्शन आता सप्टेंबरमध्येच

एमएस धोनी ( MS Dhoni ) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून १५ ऑगस्ट २०२० ला निवृत्त झाला होता. तो आता फक्त आयपीएल खेळतो. तो आता सप्टेंबरमध्ये युएईमध्ये होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत दिसणार आहे.

बीसीसीआयने आयपीएलच्या स्थगित झालेल्या १४ व्या आयपीएल हंगामातील उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. या वेळापत्रकानुसार एकूण ३१ सामने २७ दिवसात खेळले जाणार आहेत.

याची सुरुवात १९ सप्टेंबर पासून मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज सामन्याने होईल. तर साखळी फेरीची सांगता रॉयल चॅलेंजर बेंगलोर आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामन्याने ८ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

हेही वाचले का?

पाहा व्हिडिओ : प्रियांका चोप्राला आवडली कोल्हापूरची स्ट्राँग वुमन 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news