Rituraj Singh : टीव्ही अभिनेता ऋतुराज सिंह याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

Rituraj Singh
Rituraj Singh
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही इंडस्ट्रीतील ज्येष्ठ अभिनेते ऋतुराज सिंह ( Rituraj Singh ) यांचे काल मध्यरात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांनी वयाच्या ५९ वर्षीच जगाचा निरोप घेतला. ऋतुराजला मुंबईतील लोखंडवाला येथील त्याच्या राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला आणि निधन झाले. अभिनेत्याच्या निधनाने टीव्ही इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.

संबंधित बातम्या 

मिळालेल्या माहितीनुसार, टिव्ही अभिनेता ऋतुराजचा जवळचा मित्र अमित बहल याने एक पोस्ट शेअर करत त्याच्या मृत्यूची माहिती दिली आहे. या पोस्टमध्ये शोक व्यक्त करताना लिहिले आहे की, "होय, हृदयविकाराच्या झटक्याने ऋतुराजचा मृत्यू झाला आहे. स्वादुपिंडाच्या उपचारासाठी त्याला काही दिवसापूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला घरी आल्यानंतर हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचे निधन झाले."

ही माहिती सोशल मीडियावर पसरताच चाहत्यांसह अनेक कलाकरांनी श्रद्धांजली अर्पण करत आहेत. दरम्यान बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसीने एक्स ट्विटरवर पोस्ट करत ऋतुराजला श्रद्धांजली वाहिली आहे. यात त्याने लिहिले आहे की, "ऋतुराज यांचे निधन झाल्याची माहिती मिळताच मला खूपच दुःख झाले. आम्ही एकाच इमारतीत राहत होतो. निर्माता म्हणून तो माझ्या पहिल्या चित्रपटाचा भाग होता. एक मित्र आणि एक उत्तम अभिनेता गमावला… भाऊ तुझी खूप आठवण येईल… " याशिवाय त्याच्या चाहत्यांनीही शोक व्यक्त केला आहे.

ऋतुराज सिंह करिअर

९० च्या दशकात टीव्हीवर 'तोल मोल के बोल' हा रिॲलिटी गेम शो होस्ट करून स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली. यानंतर ऋतुराज सिंहने अनेक मालिका, अनेक चित्रपट आणि ओटीटी शोमध्ये काम केलं. तर त्याचा १९९३ मध्ये प्रसारित झालेला टीव्ही शो 'बनेगी अपनी बात' ही खूप गाजला. 'हिटलर दीदी', 'ज्योती', 'शपथ', 'अदालत', 'आहट', 'दीया और बाती', वॉरियर हाय', 'लाडो २' यांसारख्या मालिकांमध्येही त्याने महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news