तूरडाळ 200 रुपयांनी, तर खाद्यतेल एवढ्या रुपयांनी वाढले ? घ्या जाणून पुण्यातील आजचे दर

तूरडाळ 200 रुपयांनी, तर खाद्यतेल एवढ्या रुपयांनी वाढले ? घ्या जाणून पुण्यातील आजचे दर
Published on
Updated on

पुणे : बाजारात आवक कमी असून, मागणी चांगली असल्यामुळे तूरडाळ 200 रुपयांनी महागली. उतरलेल्या दरात मागणी निघाल्याने खाद्यतेल आणि वनस्पती तुपाचे दर 20 ते 25 रुपयांनी वाढले. गुळातील तेजी कायम असून, साखर दरात मात्र 25 रुपयांनी घट झाली. गेल्या आठवड्यात पुण्याच्या घाऊक बाजारात लग्नसराई सुरू झाल्याने ग्राहकांची वर्दळ वाढली होती.

यामुळे संमिश्र वातावरण होते. आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल, सोयाबीन आणि पामतेलाच्या दरातील घसरण थांबली आहे. स्थानिक बाजारातही महिन्याच्या सुरुवातीचा आठवडा लग्नसराईचा आहे. उतरलेल्या दरात खरेदीचे आकर्षण यामुळे सर्वच खाद्यतेलांस मागणी वाढली होती. यामुळे, शेंगदाणा तेलासह सर्वच खाद्यतेलांच्या दरात 15 किलो/लिटरच्या डब्यामागे 20 ते 25 रुपयांनी वाढ झाली. वनस्पती तुपाच्या दरातही 30 रुपयांनी वाढ झाली.

तूरडाळ महागली

तुटवड्यामुळे तूरडाळीची दरवाढ सुरूच आहे. गेल्या आठवड्यातही दरात आणखी दोनशे रुपयांनी वाढ झाली. अन्य सर्व डाळी कडधान्यांचे दर स्थिर होते. कच्चा माल महागल्याने भडंगच्या दरात 9 किलोच्या पोत्यामागे आणखी 50 रुपयांनी वाढ झाली. मागणी कमी असून, आवक भरपूर असल्याने साखर दरात क्विंटलमागे 25 रुपयांनी घट झाली. मात्र, उत्पादन कमी असून दौंडच्या केडगाव भागात गुळाला सार्वत्रिक मागणी आहे. यामुळे गुळाची दरवाढ कायम आहे.

पुण्याच्या घाऊक बाजारातील दर पुढीलप्रमाणे –

साखर (प्रतिक्विंटल) 3650 ते 3700 रु. खाद्यतेले (15 किलो/लिटर):- शेंगदाणा तेल 2775-2850, रिफाइंड तेलः 2675-3425, सरकी तेल
1500-1825, सोयाबीन तेल 1500-1825, पामतेल 1425-1625, सूर्यफूल रिफाईंड तेल 1575-1805,
वनस्पती तूप 1525-1925, खोबरेल तेल 2250 रु.

तांदूळ :- गुजरात उकडा 3200-3500, मसुरी 3000-3300, सोनामसूरी 4000-4400, एच.ए.म.टी. कोलम 4500-5000, लचकारी कोलम 5500-6000, चिन्नोर 4500-5000, 1121-10000-11000, आंबेमोहोर (सुवासिक) 7000-8000, बासमती अखंड 11500-12000, बासमती दुबार 8500-9000, बासमती तिबार 9500-10000, बासमती मोगरा 4500-5000, बासमती कणी 3200-3500, 1509- 8000-8500, इंद्रायणी 4500-5000 रु. गहू – सौराष्ट्र लोकवन नं. 1 3700-4000, सौराष्ट्र लोकवन नं. 2 3400-3600, एम.पी. लोकवन नं.1 3600-3800, नं.2 3400-3600, सिहोर 4800-5500, सिहोरी 3400-3800, मिलबर 2350-2450 रु.

ज्वारी :- गावरान नं. 1- 5000-5500, गावरान नं. 2-4600-4900, नं. 3 4200-4500, दूरी 3500-3900 रु.
बाजरी :- महिको 3200-3800, गावरान 3200-3500, हायब्रीड 3000-3200 रु.
गूळ :- गूळ एकस्ट्रा 4150-4250, गूळ नं. 1 4020-4100, गूळ नं. 2 3900-3950, गूळ नं.3 3700-3850, गूळ नं. 4 3600-3700, बॉक्स पॅकिंग 3900-5000 रु.

डाळी :- तूरडाळ 11500-12700, हरभराडाळ 5900-6100, मूगडाळ 9400-10600, मसूरडाळ 7400- 7500,
मटकीडाळ 10000-11000, उडीदडाळ 9000-10700 रु. कडधान्ये :- हरभरा 5400-5500, हुलगा – 7100-7200 चवळी 7000-9000, मसूर 6600-6800, मूग 9000-9500, मटकी गावरान 9000-9200, मटकी पॉलिश 7500-8000, मटकी गुजरात 8000- 8200, मटकी राजस्थान 8000-8200, मटकी सेलम 11500-11700, वाटाणा हिरवा 5500-6000, वाटाणा पांढरा 5500-6000, काबुली चणा 9000-15000 रु. साबुदाणा :- साबुदाणा नं.1 7000, साबुदाणा नं.2 6800, साबुदाणा नं. 3 6500 रु. वरई भगर :- 11000-12000, सावा भगर 10000-11000, गोटा खोबरे 1100-1300 रु. शेंगदाणा :- जाडा 11700-12200, स्पॅनिश – 11300-11600, घुंगरु 10500 रु.

धने :- गावरान 8000-8500, इंदूर 9000-12000 रु. मका लाल 2475-2550, पिवळा लाल 2475-2550, पांढरा 3200-3300 रु. पोहे :- मध्य प्रदेश 4000-4400, पेण 4000-4300, मध्यम पोहा-3800-4300, दगडी पोहा 3800- 4400, पातळ पोहा 4400-5200, सुपर पोहा 4400-4700, भाजका पोहा 600-650, मका पोहा 625-675, भाजके डाळे 2800-3200, मुरमुरा (9 किलोस) 475-525, भडंग 750-850, घोटी 450- 475, सुरती 475-500 रु. रवा, मैदा, आटा – (50 किलोचा भाव) आटा 1450-1500, रवा 1475-1525, मैदा 1475-1525, बेसन :- (50 किलोस) 3300-3600 रु. मीठ :- मीठ खडे (50 किलोस) 230, मीठ दळलेले (50 किलोस) 250 रु. मिरची :- काश्मीरी ढब्बी 7000-75000, ब्याडगी 57500-60000, लवंगी तेजा 24000-25000, गुंटूर 25000-27000, खुडवा गंटूर 14000-15000, खुडवा ब्याडगी 17000- 20000 रु. नारळ :- (शेकडयाचा भाव): नवा पॅकिंग 1100-1200, मद्रास 2300-2500, पालकोल जुना 1400-1450, सापसोल 2000-2700 रु.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news