पुढारी ऑनलाईन डेस्क : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्माच्या मृत्यूप्रकरणी (Tunisha Sharma Death Case) तिचा बॉयफ्रेंड आणि सहकलाकार अभिनेता शीझान खानला वसई कोर्टाने उद्यापर्यंत कोठडी सुनावली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. दरम्यान, तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी एका वृत्त एजन्सीला दिलेल्या माहितीनुसार, जो पर्यंत शीझानला शिक्षा होत नाही, तोपर्यंत गप्प बसणार नाही, असे सांगितले आहे.
आज वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत शीझान आणि त्याच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. दरम्यान, शीझानचे वकिल म्हणाले की, पोलिस तपास करत आहेत आणि शीझानविरोधात पोलिसांना पुरावे मिळालेले नाहीत. तुनिषाच्या आईने केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहेत. पोलिस तपास करत आङेत, आम्ही प्रतीक्षा करतोय. मला पूर्ण विश्वास आहे की, तो दोषी ठरणार नाही. (Tunisha Sharma Death Case)