पुडारी ऑनलाईन डेस्क : शीझान खान सेटवर नशा करत होता; असे तुनिषा सांगायची, असा धक्कादायक खुलासा अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आईने केला आहे. तुनिषाने तिच्या आईला ही गोष्ट सांगितली होती, असा खुलासा तुनिषाची आई वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. वनिता शर्मा म्हणाल्या, तुनिषाचं त्यांच्या घरी येणं जाणं होतं. शीझानची आई तिला बोलावून घ्यायची. त्याचा वाढदिवस होता, त्यावेळी ती २५-५० हजारांचे गिफ्ट त्याला द्यायची. त्याच्यासाठी तिने संपूर्ण घर डेकोरेट केलं होतं. (Tunisha Sharma Death case)
शिझानसोबतच्या ब्रेकअपनंतर ती तणावात होती. त्यावेळी वनिता शर्मा सेटवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी आपल्या मुलीला विचारलं होतं की, तू ठीक आहेस ना? त्यावेळी ती म्हणाली की, काही प्रॉब्लेम नाही आई. मी खूप कामात असल्यामुळे तुम्हाला वेळ देऊ शकले नाही, अशीही माहिती वनिता शर्मा यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तिच्याशी जवळीक करण्यासाठी आणि तिला मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणला जात होता, असा आरोप तुनिषाच्या आईने केला. त्या पुढे म्हणाल्या की, मला तुनिषाने सांगितले की, शीझानशी जरा बोल. मी शीझानला भेटले आणि विचारलं. तेव्हा तो म्हणाला, आंटी सॉरी, मी काही करू शकत नाही. तुनिषा चिंतेत होती. मी तिला सांगितलं की, बेटी चिंता करण्याची कोणती गोष्ट नाही. ती खूप संवेदनशील होती. तुनिषाच्या वर्तनात बदल झाले होते. ब्रेकअपनंतर ती तणावात होती. (Tunisha Sharma Death case)
तुनिषा चंदिगढ जाणार होती. तिने आपल्या आईला सांगितलं होतं की, ख्रिसमसला तिला चंदिगढला जायचं होतं. तिने दोन दिवसांसाठीची परवानगी आपल्या आईकडे मागितली होती. त्यानंतर तुनिषाची आई तिला तिकिट काढून देणार होती.
वनिता शर्मा म्हणाल्या- तुनिषाच्या मृत्यूदिवशी सेटवरून फोन आला की, तुनिषा दरवाजा उघडत नाही. त्याचदिवशी माझी मुलगी गेली.
वनिता शर्मा यांनी शीझान आणि शीझानच्या आईवर गंभीर आरोप केले आहेत. शीझानला माहिती होतं की, तिचं वय काय आहे. ती खूप संवेदनशील आहे. त्याचे दुसऱ्या मुलीशी संबंध आहेत. तरीही त्याने तुनिषाचा वापर करून घेतला. ब्रेकअपवेळी तुला जे काही करायचं ते कर असं, शीझान तिला म्हणाला होता. त्यानंतर ती तणावात होती. शीझानचे दुसऱ्या मुलीशी संबंध होते तर तुनिषाशी जवळीकता का केली? शीझानची आई मला बोलल्या नाहीत. माझ्या मुलीला फोन करून बोलायच्या. शीझानच्या दुसऱ्या गर्लफ्रेंडबद्दल सांगत राहायची. तुनिषाने मला सांगितलं होतं की, शीझानची आई मला फोनवरून बोलत राहते.
यावेळी खुनाचीदेखील शक्यता नाकारता येत नाही, असे वनिता शर्मा म्हणाल्या. तिला फासावरून खाली उतरवल्यानंतर १५ मिनिटे कोणतीच गाडी आली नाही, असाही खुलासा तुनिषाची आई वनिता शर्मा हिने केला आहे.