आई राजा उदो उदो…तुळजाभवानी मंदिरात जल्लोषात सीमोल्लंघन

तुळजापूर : भाविकांच्या प्रचंड गर्दीत तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला
तुळजापूर : भाविकांच्या प्रचंड गर्दीत तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा पार पडला
Published on
Updated on

तुळजापूर – पुढारी वृत्तसेवा : तुळजाभवानी मातेचा सीमोल्लंघन सोहळा मंगळवारी (दि. २४) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. मंदिरात पहाटे विधीवत पूजा आणि आरती करुन देवीचे माहेर असणाऱ्या नगरहून आलेल्या मानाच्या पालखीत देवीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. पिंपळाच्या पारावर देवीची पालखी ठेवून पुन्हा आरती करण्यात आली. मिरवणुकीनंतर प्रथेप्रमाणे पारंपरिक पद्धतीने मंत्रोच्चार, 'आई राजा उदो उदो'चा जयघोष आणि पारंपरिक संबळ वाद्याच्या साथीने सर्व विधी करण्यात आले.

तुळजाभवानी देवीची मूर्ती ही चल मूर्ती असल्याने ती आपले सिंहासन सोडून सीमोल्लंघन करण्यासाठी भाविकांच्या बरोबर मंदिराच्या बाहेर येते. सीमोल्लंघनानंतर देवी पुन्हा पौर्णिमेपर्यंत निद्रा अवस्थेत जाते. यावेळी देवीच्या मूर्तीला इजा होऊ नये म्हणून १०८ साड्या नेसवण्यात येतात. शेवटी प्रथेनुसार नगरच्या भक्तांनी श्रीदेवीच्या पालखीचे होममध्ये विसर्जन केले. यावेळी सर्व भाविकांनी कूंकू व फुलांची उधळण करत 'आई राजा उदो-उदो'चा जल्लोष केल्याने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

यावेळी मंदिरातील धार्मिक कार्यक्रमास तुळजाभवानी मंदिरात जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंम्बासे, विश्वस्त आ. राणा जगजितसिंह पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी योगेश खरमटे, तहसीलदार तथा व्यवस्थापक (प्रशासन) सोमनाथ माळी, मंदिर संस्थानचे सहायक व्यवस्थापक सिद्धेश्वर इंतुले, सहायक जनसंपर्क अधिकारी गणेश मोटे यांच्यासह महंत, उपाध्ये, भोपे, पाळीकर, पुजारी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news