तुला शिकवीन चांगलाच धडा : प्रेमाच्या परीक्षेत मिळेल का अधिपतीला अक्षराची साथ

तुला शिकवीन चांगलाच धडा
तुला शिकवीन चांगलाच धडा

पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहे. आता मालिकेत आणखी मज्जा येणार आहे. कारण 'अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात प्रवेश घेतला आहे.

अधिपतीला शाळेतील कपड्यांमध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो, ज्यांनी तिचे पाऊल परत मागे फिरतात. भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या अटींमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता. पण मास्तरीणबाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली. कारण अक्षराची मनधरणी करायची आहे.

म्हणतात ना प्रेमाच्या लढाईत सगळंच माफ असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ज्यायोगे अक्षरा त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही. आता या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का? अक्षरा त्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का? भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळाप्रवेशाबाबत बातमी कळल्यावर काय होईल? हे सर्व तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. अधिपती-अक्षराची प्रेमाची शाळा 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वा फक्त झी मराठीवर पाहता येणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news