पुढारी ऑनलाईन डेस्क : 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये एक रंजक वळण आले आहे आणि ते घेऊन आली आहे सरगम. अधिपतीला भुवनेश्वरी कडून गाणं शिकायची परवानगी मिळते. अक्षरा आणि भुवनेश्वरी दोघेही अधिपतीला गाणे शिकवण्यासाठी शिक्षक शोधू लागतात. अक्षरा तिच्या शिक्षिकेला घरी आणते पण भुवनेश्वरी तिला बाहेर काढते आणि स्वतः निवडून आणलेली गायन शिक्षिका घरी आणते. हे पाहून घरातील प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. अधिपतीला गायन शिकण्याची परवानगी देण्याच्या भुवनेश्वरीच्या निर्णयाने सर्व आधीच आश्चर्यात आहे. भुवनेश्वरीने आणलेल्या शिक्षिकेचे नाव सरगम आहे.
सरगमला, अधिपतीच्या आयुष्यात आणण्यामागे भुवनेश्वरीच षड्यंत्र तर नसेल ? अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्यात हे नवीन वादळ काय घेऊन येणार? अक्षराच्या डोळ्यांसमोर सरगम अधिपतीला आपल्या प्रेमाच्या जाळयात ओढेल ? यासाठी पाहायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' रोज रात्री ८ वा. फक्त झी मराठीवर.