भयानक अपघात! ट्रकनं गरोदर महिलेला चिरडलं; गर्भाशयातून बाळ जिवंत बाहेर आलं

भयानक अपघात! ट्रकनं गरोदर महिलेला चिरडलं; गर्भाशयातून बाळ जिवंत बाहेर आलं
Published on
Updated on

फिरोजाबाद; पुढारी ऑनलाईन : उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आठ महिन्याच्या एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला आहे. हा अपघात इतका भयानक होता की महिलेचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर गर्भाशयातून बाळ बाहेर आले. सुदैवाने बाळ आश्चर्यकारकरित्या बचावले असून त्याला फिरोजाबाद येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाळाला काही झालेले नाही. पण त्याला उपचाराची गरज असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे.

अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव कामिनी असे आहे. ही २६ वर्षीय महिला आग्रा येथील रहिवासी आहे. ती तिच्या पतीसह कोटला फरीहा येथे आई-वडिलांच्या घरी जात होती. या दरम्यान अपघात घडला. स्थानिक रहिवाशांनी सांगितले की, तिचा पती रामूचे विरुद्ध दिशेने येणाऱ्या कारला चुकवण्याच्या प्रयत्नात मोटरसायकलवरील नियंत्रण सुटले. यामुळे त्याची पत्नी खाली पडली आणि भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने तिला चिरडले. यात तिचा मृत्यू झाला. या दरम्यान गर्भाशयातील बाळ बाहेर पडले. पण ते सुरक्षित आहे. तर बाळाचे वडीलही सुरक्षित असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

ट्रकचा चालक घटनास्थळावरुन गाडी सोडून पळून गेला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली जात आहे. पतीच्या तक्रारीच्या आधारे एफआयआर नोंदवण्यात येईल. असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

 हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news