Bharat Rashtra Samithi : ‘टीआरएस’ झाला ‘भारत राष्‍ट्र समिती’, के. चंद्रशेखर रावांची राष्‍ट्रीय राजकारणावर नजर

Bharat Rashtra Samithi : ‘टीआरएस’ झाला ‘भारत राष्‍ट्र समिती’, के. चंद्रशेखर रावांची राष्‍ट्रीय राजकारणावर नजर
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : तेलंगणाचे मुख्‍यमंत्री आणि तेलंगणा राष्‍ट्र समितीचे प्रमुख के. चंद्रशेखर राव यांनी आपल्‍या पक्षाचे नाव भारत राष्‍ट्र समिती ( बीआरएस ) असे केले आहे. २०२४ च्‍या लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्‍ट्रीय राजकारणात प्रवेश करण्‍यासाठी राव यांनी पक्षाचे नाव बदलण्‍यात आल्‍याचे मानले जात आहे. ( Bharat Rashtra Samithi )

२००० मध्‍ये तेलंगणा राष्‍ट्र समिती पक्षाची स्‍थापना झाली. आता हा पक्ष बीआरएस रुपाने एक राष्‍ट्रीय पक्ष झाला आहे. पक्षाच्‍या नावात बदल करण्‍याचा प्रस्‍ताव पक्षाच्‍या बैठकीत मंजूर करण्‍यात आला. पक्षाध्‍यक्ष के. चंद्रशेखर राव यांनी हा प्रस्‍ताव वाचला. एकमताने तो मंजूर करण्‍यात आला. या बैठकीत २८० हून अधिक पक्षाचे सदस्‍य, आमदार आणि खासदार उपस्‍थित होते.

पक्षाच्‍या नावात झालेल्‍या बदलाचा प्रस्‍ताव हा गुरुवारी( दि. ६) किंवा शुक्रवारी ( दि. ७ ) निवडणूक आयोगाला पाठविण्‍यात येणार आहेत. लवकर के. चंद्रशेखर राव आपल्‍या राष्‍ट्रीय राजकारणातील भूमिका स्‍पष्‍ट करतील, असे मानले जात आहे.पक्षाच्‍या नावात बदलावेळी कर्नाटकचे माजी मुख्‍यमंत्री आणि संयुक्‍त जनता दलाचे ( एस) नेते एच. डी. कुमारस्‍वामी तलंगाना भवनमध्‍ये उपस्‍थित होते. कुमारस्‍वामी २० आमदारांसह मंगळवारी हैदराबादला पोहचले होते. दरम्‍यान, पक्षाच्‍या नावात बदल केल्‍यानंतर एमआयएमचे अध्‍यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी के. चंद्रशेखर राव यांचे अभिनंदन केले.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news