Tripura Election Reults 2023 Live | त्रिपुरा विधानसभा : भाजप ३२ जागांवर आघाडीवर

Tripura Election Reults 2023 Live | त्रिपुरा विधानसभा : भाजप ३२ जागांवर आघाडीवर

Tripura Election Reults 2023 Live Updates :

  • त्रिपुरामधील आतापर्यंतचा निकाल पाहता भाजप आघाडीवर आहे. एकुण ३४ जागावर भाजपाने आघाडी आहे. कॉंग्रेससह डाव्या विचारसरणीचे १४ जागांवर आघाडीवर, टिप्रा १२ जागांवर तर अपक्ष १ आघाडीवर आहे.
  • नुकत्याच हाती आलेल्या निकालानूसार एकुण ३१ जागांवर भाजप आघाडीवर, तर कॉंग्रेससह डाव्या विचारसरणीचे १६ जागांवर आघाडीवर, टिप्रा १२ जागांवर तर अपक्ष १ आघाडीवर आहे.
  • अद्यापही भाजपा आघाडीवर आहे. एकुण ३० जागांवर भाजप आघाडीवर, तर कॉंग्रेससह डाव्या विचारसरणीचे १६ जागांवर आघाडीवर, टिप्रा १३ जागांवर तर अपक्ष १ आघाडीवर आहे.
  • नुकत्याच हाती आलेल्या निकालानूसार भाजप ३० जागांवर आघाडीवर आहे. पुन्हा एकदा भाजप सत्ता कायम असणार की नाही याकडे लक्ष लागून राहीले आहे.
  • २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने त्रिपुरामध्ये ३५ जागा जिंकल्या होत्या. सीपीआय(एम) ने १६, आयपीएफटीने ८ जागा जिंकल्या होत्या. यावेळी भाजप यापेक्षा खूप पुढे जात असल्याचे दिसत आहे.
  • त्रिपुरामध्ये आतापर्यंत ६० जागांचे कल समोर आले आहेत. भाजप अजुनही बहुमत असून ३९ जागांवर आघाडीवर आहे. दुसरीकडे काँग्रेस-डावी आघाडी १५ जागांवर तर टिपरा ६ जागांवर आघाडीवर आहे.
  • भाजप ३७ जागांवर आघाडीवर, काँग्रेस आणि डावे १५ जागांवर आणि टिपरा ६ जागांवर आघाडीवर आहेत.
  • त्रिपुरामध्ये आतापर्यंत ५३ जागांचे निकाल  समोर आले आहेत. यामध्ये भाजप अजुनही ३४ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस आणि डावे पक्ष १४ जागांवर तर टिपरा ६ जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे सुरुवातीच्या निकालात भाजपला बहुमत मिळाले आहे.
  • भाजपने आघाडी कायम ठेवली आहे. भाजप २४ जागांवर, काँग्रेस आणि डावे ९ आणि टिपरा ५ जागांवर आघाडीवर आहे.
  • सध्या भाजप १० जागांवर तर काँग्रेस आणि डाव्या पक्ष ६ जागांवर आघाडीवर आहेत. अद्याप पोस्टल मतांची मोजणी सुरू आहे.
  • मेघालय, त्रिपुरा आणि नागालँड या ईशान्येकडील तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. त्रिपुरामध्ये भाजप आघाडीवर आहे.  या तीन राज्यांपैकी, सर्वांच्या नजरा त्रिपुरावर आहे. पोस्टल मतांची मोजणी अद्याप सुरू आहे.  भाजप 5 सीटने आघाडीवर आहे.  
  • भाजपच्या युतीने २१ जागांवर आघाडी घेतली आहे. टीएमपी ६ जागांवर तर डाव्यांची युती ११ जागांवर आघाडीवर आहे.

त्रिपुरा विधानसभेच्या ६० जागांचे निकाल आज गुरुवारी (दि.२) जाहीर होत आहे. प्राथमिक फेरीत भाजप युतीने सर्वाधिक जागांवर आघाडी घेतली आहे. या निवडणुकीसाठी विक्रमी ८६.१० टक्के मतदानाची नोंद झाली होती. यापूर्वी २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये ९० टक्के मतदान झाले होते आणि भाजपने सरकार स्थापन केले होते. सलग २५ वर्ष डाव्‍यांनी त्रिपुरामधील सत्ता अबाधित ठेवली होती. मात्र २०१८ विधानसभा निवडणुकीत भाजपने डाव्‍यांचा पराभव करत प्रथम राज्‍यातील विधानसभेवर भाजपचा झेंडा फडकविला होता. यंदा भाजप आणि डावे-काँग्रेस आघाडीसह राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा यांच्या नेतृत्वाखाली नव्याने स्थापन झालेली टिप्रा मोथा पक्षही निवडणूक रिंगणात आहे. या नव्‍या पक्षाने 'ग्रेटर टिपरलँड' या राज्यातील आदिवासींसाठी स्वतंत्र राज्यासाठी प्रयत्‍न करणार असल्‍याची ग्‍वाही दिली आहे. पश्‍चिम बंगालच्‍या मुख्‍यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्षही आपले नशीब आजमावत आहे.

विधानसभेच्‍या ६० जागांपैकी भाजपने ५५ जागा लढवल्या आहेत. तर मित्र पक्ष आयपीएफटीला उर्वरीत जागा दिल्‍या आहेत. कम्‍युनिस्‍ट पार्टी ऑफ इंडिया ( एम) ४७ जागा तर काँग्रेसने १३ जागा लढवल्या आहेत. तृणमूल काँग्रेसने २८ मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले आहेत. ६० विधानसभा मतदारसंघांमध्‍ये २५९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. यातील २० महिला आहेत. सत्ताधारी भाजपने अन्‍य पक्षांच्‍या तुलनेत सर्वाधिक १२ महिलंना उमेदवारी दिली आहे.

प्रद्योत देववर्मा ठरणार 'किंगमेकर'?

यंदाच्‍या निवडणुकीत टिप्रा मोथा या नवीन पक्षाने सत्ताधारी भाजपसह काँग्रेस-सीपीआय ( एम) युतीसमोर मोठे आव्‍हान निर्माण केले आहे. त्रिपुराच्या राजेशाही घराण्‍यातील प्रद्योत देववर्मा हे या पक्षाचे प्रमुख आहेत. आदिवासी समाजाचे नेते अशी त्‍यांची ओळख झाली आहे. आपणच राज्‍यात किंगमेकर ठरु, असा दावा ते करत आहेत. विशेष म्‍हणजे २०२१ मध्‍ये झालेल्‍या राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज संस्‍थेच्‍या निवडणुकीत टिप्रा मोथा यांच्‍या पक्षाला घवघवीत यश मिळघले होते. त्‍यांनी ३० पैकी १८ जागा जिंकल्‍या होत्‍या. आता राज्‍यातील विधानसभेच्‍या ६० मतदारसंघांपैकी ३० मतदारसंघ हे आदिवासी बहुल आहेत. टिप्रा मोथा पक्ष हा ४२ जागा लढवत आहे. राज्‍यात बांगलादेशातील हिंदू स्‍थलांतरितांमुळे स्‍थानिक लोक आपल्‍याच जन्‍मभूमीत अल्‍पसंख्‍यांक झाले आहेत. त्‍यांच्‍या या भूमिकेला स्‍थानिकांचा उत्‍स्‍फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्‍यामुळे यांनी निर्माण केलेल्‍या आव्‍हानाला विरोधी पक्षाला हलक्‍यात घेवून चालणार नाही, असे राज्‍यातील राजकीय विश्‍लेषक स्‍पष्‍ट करत आहेत.

भाजपसाठी प्रतिष्‍ठेची लढाई

त्रिपुरात विधानसभा निवडणुकीच्‍या मागील एक महिन्‍यांहून अधिक काळ प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्‍ठेची ठरली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, भापजचे राष्‍ट्रीय जेपी नड्डा यांच्‍या अनेक केंद्रीय मंत्र्‍यांनी प्रचार केला. माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी आणि ज्येष्ठ नेते प्रकाश करात, वृंदा करात आणि मोहम्मद सलीम यांच्यासह माजी मुख्यमंत्री माणिक सरकार आणि पक्षाचे राज्य सचिव जितेंद्र चौधरी यांनीही जोरदार प्रचार केला. काँग्रेसचे नेते अधीर चौधरी, दीपा दासमुन्शी आणि AICC सरचिटणीस अजय कुमार यांनी प्रचार केला. प्रद्योत देववर्मा यांच्‍या टिप्रा मोथा पक्षाने स्‍वबळाचा नारा देत प्रचारात आघाडी घेतली होती. (Tripura Election Reults 2023 Live)

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news