Jammu – Kashmir: जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बिजबिहारा येथील आपत्कालीन धावपट्टीची आज चाचणी

Jammu – Kashmir: जम्मू-श्रीनगर महामार्गावरील बिजबिहारा येथील आपत्कालीन धावपट्टीची आज चाचणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : काश्मीर खोऱ्यातील अनंतनाग जिल्ह्यातील बिजबिहारा येथे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर बांधण्यात आलेल्या आपत्कालीन धावपट्टीवर आज (दि.१) चाचणी घेण्यात येणार आहे. याबाबतची सर्व तयारी हवाई दलाने पूर्ण केली आहे. येथे कडक सुरक्षा व्यवस्थाही ठेवण्यात आली आहे. Jammu – Kashmir

लँडिंग आणि टेक ऑफ चाचण्यांपूर्वी सुरक्षा वाढवल्यानंतर सुरक्षा कर्मचारी जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावर पहारा देत आहेत. त्याचबरोबर वाहतूकही वळवण्यात आली आहे. जम्मू-श्रीनगर दरम्यान जाणारी वाहने जुन्या महामार्गाकडे वळवण्यात आली आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही धावपट्टी २०२० मध्ये तयार केली असून आज ट्रायल घेण्यात येणार आहे. एकेकाळी दहशतवाद्यांचा अड्डा मानल्या जाणाऱ्या दक्षिण काश्मीरमधील परिसरात आता परिस्थिती बदलत आहे. आता खोऱ्यातील दहशतवाद्यांच्या कारवाईत लक्षणीय घसरण झाली आहे.Jammu – Kashmir

दरम्यान, या धावपट्टीची चाचणी पूर्ण झाल्याने सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार आहे. आणीबाणीच्या परिस्थितीत सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news