विमान प्रवास करताय? ही सीट चुकूनही बुक करू नका!

विमान प्रवास
विमान प्रवास

दुबई : विमान प्रवास म्हटले की, आनंदाचे उधाण तर येणारच. अशावेळी तिकीट बुकिंगचा आनंद देखील वेगळाच असतो. यावेळी प्राधान्यक्रम असतो, विंडो सीटचा. विंडो सीटवर बसून आकाश पाहणे, मुंगीसारखी दिसणार्‍या छोट्या इमारती, गाड्या पाहणे प्रत्येकाला आवडू शकते. पण, विमान प्रवासात काही सीट अशाही असतात, जेथून प्रवासाचा किंचितही आनंद लुटता येत नाही आणि अलीकडेच एका पायलटने याचे सविस्तर विवेचन केले.

डेली स्टार न्यूज वेबसाईटने दिलेल्या रिपोर्टनुसार, पॅट्रिक स्मिथ या एअरलाईन पालयटने तिकीट बुक करताना नेमके काय करू नये, याची माहिती दिली. फ्लाईटमध्ये बरेच सीट उपलब्ध असतील आणि पर्याय हाताशी उपलब्ध असतील तर अशा वेळी मागील सीट अजिबात निवडू नये, असे पॅट्रिकने म्हटले आहे. मागील सीटवर सर्वात जास्त टर्ब्युलन्स कळते. हवामान खराब झाल्यास विमान किंचित हलू लागते, याला टर्ब्युलन्स म्हणतात.

याच कारणामुळे एअरलाईन कोणतेही असो, पर्याय निवडणे शक्य असले तरी शक्यतो पुढील सीट बुक करण्यावर भर द्यावा. मागील सीट शक्यतो टाळाव्यात, असे सांगितले जाते. पुढील बाजूस असणारी सीट मिळावी, यासाठी लवकर बुकिंग करावे, अशीही पॅट्रिक स्मिथ यांची सूचना आहे.

विमानात पुढे जागा असल्यास काहीच जाणवणार नाही. अगदी मधल्या टप्प्यात असले तरी काही जाणवत नाही. पण, मागील बाजूस खूपच फरक पडतो आणि यामुळे आपली सीट मागे असणार नाही, याची खातरजमा करून घ्यायला हवी, असे स्मिथ यांनी याप्रसंगी स्पष्ट केले आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news