Shiv Sena : शिवसेना भवन, पक्षनिधी, सर्व शाखा एकनाथ शिंदेंकडे हस्तांतरित करा: सर्वोच्च न्यायालयात याचिका  

सर्वोच्च न्यायालय:
सर्वोच्च न्यायालय:

नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा :  केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना (Shiv Sena) पक्षनाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला दिल्यानंतर आता शिवसेना भवन आणि पक्षनिधी शिंदेंना देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. अॅड.आशिष गिरी यांनी ही याचिका दाखल केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने शिंदेंना अध्यक्ष म्हणून कायम ठेवले तर शिवसेना (Shiv Sena) भवन,निधी आणि सर्व शाखा त्यांच्याकडे हस्तांतरित कराव्या. शिवाय निकाल लागेपर्यंत निधी वापरण्यावर निर्बंध घालण्यात यावा,अशी मागणी याचिकेतून करण्यात आल्याचे अॅड. गिरी म्हणाले. निवडणूक आयोगाच्या निकालासंदर्भात ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात गिरी यांनी देखील याचिका दाखल केली असून दोन्ही याचिकांवर एकत्रित सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी याचिकेतून केली आहे.

आपण कुठल्याही गटाशी संबंधित नसून याचिकेचा शिंदे गटाशी संबंध नाही. एक वकील आणि मतदान असल्याने हस्तक्षेप याचिका दाखल केल्याचे अॅड.गिरी यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना स्पष्ट केले. याचिकेचा निकाला लागेपर्यंत सर्व गोष्टींवर निर्बंध लावण्यात यावे, अशी मागणी अॅड.गिरी यांनी केली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. या प्रकरणात ठाकरे गटाच्या वतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला होता. प्रकरण न्यायप्रविष्ट असताना निवडणूक आयोगाने बहुमताच्या आधारे आपला निर्णय दिला आहे. त्यामुळे शिंदे गट पक्षाचा निधी आणि कार्यालयावरही दावा करू शकतात, असा युक्तिवाद सिब्बल यांनी केला होता. पंरतु, आयोगाच्या निर्णयावर स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला होता. याप्रकरणी आता २४ एप्रिलला सुनावणी होणार आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news