इंदापूर, पुढारी वृत्तसेवा : बारामतीतील विमानतळावरून उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी नजीक शेतात कोसळले आहे. विमान कशामुळे पडले अद्याप स्पष्टता नाही. मात्र या ठिकाणी कार्वर प्रशिक्षण केंद्राचे संबधित विभागाचे अधिाकरी आणि प्रशिक्षक घटनास्थळी पोहचले आहेत.
बारामती काऱ्व्हर मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जाते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक इंदापूर तालुक्यातील कडबनवाडी येथे पोंद्कुले वस्ती येथे बाराहाते यांच्या शेतात कोसळले. ही घटना समजतात शेजारील वस्तीवरील तरुण त्या ठिकाणी पोचले. त्यांनी महिला पायलटला सुरक्षितरित्या बाहेर काढले.
या महिला पायलट किरकोळ जखमी झाल्या असून, विमानाची मात्र मोठी दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी बारामती हून अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे पथक पोहोचले असून त्यांनी घटनेची चाैकशी सुरू केली आहे.