Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपूरच्या कासेगावात ट्रॅक्टर रॅली

Maratha reservation : मराठा आरक्षणासाठी पंढरपूरच्या कासेगावात ट्रॅक्टर रॅली
Published on
Updated on

पंढरपूर : पुढारी वृत्तसेवा : मराठा आरक्षणासाठी सकल मराठा समाज आक्रमक होताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कासेगाव (ता. पंढरपूर) येथे ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. कासेगाव येथे आगोदर पासूनच ग्रामस्थांनी साखळी उपोषण सुरू केलेले आहे. यातच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सकल मराठा समाजाकडून गुरुवारी सकाळी शेकडो ट्रॅक्टरची रॅली काढण्यात आली. कासेगाव येथून ही रॅली सांगोला-पंढरपूर रोडवर असलेल्या कासेगाव फाटा येथे आणण्यात आली.

या रॅलीत शेकडो ट्रॅक्टर घेऊन आंदोलक सहभागी झाले होते. या रॅलीमुळे पंढरपूर सांगोला रोडवर तसेच बायपास रोडवर देखील वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पंढरपूर तालुक्यात मराठा आरक्षणाची धग वाढत आहे. गावोगावी राजकीय नेतेमंडळी यांना गावबंदी तसेच पंढरपूर शहर बंदी करण्यात आलेली आहे.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news