Ban on Dutee Chand : महिला धावपटू दुती चंदवर 4 वर्षांची बंदी

Ban on Dutee Chand : महिला धावपटू दुती चंदवर 4 वर्षांची बंदी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ban on Dutee Chand : भारतातील सर्वात वेगवान महिला धावपटूंपैकी एक असलेल्या दुती चंद (Dutee Chand) डोपिंगच्या (Doping) जाळ्यात अडकली असून प्रतिबंधित पदार्थांच्या सेवनामुळे तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (NADA) द्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. तिच्यावरील बंदीचा कालावधी 3 जानेवारी 2023 पासून लागू होईल असे नाडाने सांगितले आहे. दरम्यान, दुतीला या बंदीविरोधात अपील करण्यासाठी 21 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे.

प्रतिबंधित पदार्थ आढळला

दुती चंदने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्यामुळे तिच्यावर कारवाई करण्यात आली आहे. तिच्या डोपिंग टेस्ट (Doping Test) मध्ये सिलेक्टिव एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर (SARMs) हा प्रतिबंधित पदार्थ आढळला होता. त्यानंतर जानेवारी 2023 पासून तिचे तात्पुरते निलंबन करण्यात आले होते. त्यामुळे ती आतापर्यंतच्या सर्व स्पर्धांमधून बाहेर पडली होती. आता तिच्यावर चार वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. (Ban on Dutee Chand)

दुतीच्या नमुन्यांमध्ये प्रतिबंधित पदार्थ सिलेक्टिव्ह एंड्रोजन रिसेप्टर मॉड्युलेटर (SARM) आढळले. 'SARM' हे 'नॉन-स्टिरॉइड' पदार्थ असतात जे सामान्यतः ऑस्टिओपोरोसिस (हाडांशी संबंधित रोग), अॅनिमिया (अ‍ॅनिमिया) आणि दुखापतीतून बरे होणाऱ्या रुग्णांसाठी दिले जातात.

डिसेंबर 2022 मध्ये चाचणीसाठी दोन नमुने घेण्यात आले

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दुती चंदचे गेल्या वर्षी 5 आणि 26 डिसेंबर रोजी चाचणीसाठी दोन नमुने घेण्यात आले होते. तिच्या पहिल्या नमुन्यात अँडारिन, ऑस्टारिन आणि लिंगंड्रोल आढळले आहेत. तर दुसऱ्या नमुन्यात अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळले. त्यानंतर दुतीला बी नमुना चाचणी देण्याची संधी होती. त्यासाठी तिला सात दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र दुतीने तसे केले नाही. (Ban on Dutee Chand)

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी

दुतीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. 2018 च्या जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने 2 रौप्य पदके (100m आणि 200m) जिंकली. तर 2021 सालच्या ग्रां प्रीमध्ये 100 मीटरची शर्यत 11.17 सेकंदात पूर्ण करून राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला, जो अजूनही कायम आहे. दुतीने 2013 मध्ये पुण्यात झालेल्या आशियाई चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक तसेच 2017 मध्ये भुवनेश्वरमध्येही कांस्यपदक जिंकले आहे. तर 2016 मध्ये दुतीने दक्षिण आशियाई स्पर्धेत रौप्य पदकावर नाव कोरले होते. दुतीने कनिष्ठ गटातही अप्रतिम कामगिरी केली होती. 2014 च्या आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तिने 2 सुवर्णपदके (200m आणि 4x400m) आपल्या नावावर केली होती.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news