आमदार अनिल बाबर यांच्या निधनानंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक रद्द; मुख्यमंत्री सांगलीला रवाना

State Cabinet Meeting
State Cabinet Meeting

पुढारी ऑनलाईन डेस्क : शिवसेनेचे आमदार अनिल बाबर (Shiv Sena MLA Anil Babar) यांचे आज (दि.३१) सकाळी सांगलीतील रुग्णालयात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती ठीक नव्हती. बाबर यांच्या निधनामुळे राज्य मंत्रिमंडळाची आजची बैठक रद्द करण्यात आली आहे. त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी मुख्यमंत्री सांगलीला रवाना झाले आहेत.

आ. बाबर यांनी वयाच्या ७४ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे खानापूर मतदारसंघांचे आमदार अनिल बाबर यांचे आज बुधवारी सकाळी निधन झाले. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखरेचा श्वास घेतला. त्यांना कफचा त्रास होत असल्याने सांगलीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज त्यांची प्राणज्योत मालवली. (Shiv Sena MLA Anil Babar)

बाबर यांना कफचा त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी सांगलीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. १९९० ते १९९५, १९९९ ते २००४ आणि २०१४ ते २०२४ असे चार वेळा ते आमदार राहिलेत. अनिल बाबर यांचा राजकीय प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि आता शिंदेंची शिवसेना असा राहिला आहे. त्यांनी खानापूर, आटपाडी, कवठेमंकाळ, जत इत्यादी दुष्काळी टापूत टेंभू योजनेचे पाणी पोहोचवले होते. त्यामुळे त्यांचा पाणीदार आमदार अशी देखील ओळख निर्माण झाली होती. बाबर यांच्या निधनाने सांगलीसह महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. (Shiv Sena MLA Anil Babar)

आमदार अनिल बाबर यांचे पार्थिव दुपारपासून विटा येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर आज बुधवारी दुपारी चार वाजता सांगली जिल्ह्यातील गार्डी (ता. खानापूर) येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. (Shiv Sena MLA Anil Babar)

जवळचा सहकारी गमावला : मुख्यमंत्री

बाबर यांच्या निधनाबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुःख व्यक्त केले आहे. "आमदार अनिल बाबर यांच्या निधनाने खऱ्या अर्थाने शिवसेनेचा समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी असा लोकप्रतिनिधी गमावला आहे", अशा शब्दांत शोकभावना व्यक्त करून मुख्यमंत्री शिंदे यांनी आमदार बाबर यांना श्रद्धांजली वाहिली आहे. याबाबत मुख्यमंत्री शिंदे यांनी X वर पोस्ट केली आहे. आ. बाबर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिल्या आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news