आजचे राशिभविष्य (दि. 11 सप्टेंबर २०२२)

आजचे राशिभविष्य
आजचे राशिभविष्य
मेष
मेष

मेष : महत्त्वाच्या कामांना प्राधान्य देणार आहात. हाती घेतलेल्या कामामध्ये यश लाभणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात प्रगती होईल.

वृषभ
वृषभ

वृषभ : नोकरीमध्ये वादावादीची शक्यता. काही महत्त्वाची कामे शक्यतो टाळावीत. आरोग्याची काळजी घ्या. कायद्याचे नियम पाळणे आवश्यक. शांत राहा.

मिथुन
मिथुन

मिथुन : तरुणवर्गाला प्रेमात यश मिळणार आहे. एखादी भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराशी मधुर संबंध राहतील.

कर्क
कर्क

कर्क : नोकरीत स्थिती चांगली असेल. कुटुंबीय आपल्या मर्जीप्रमाणे वागणार आहेत. घरातील महत्त्वाच्या निर्णयांमध्ये सल्ला मान्य होईल.

सिंह
सिंह

सिंह : नोकरीमध्ये वातावरण चांगले असेल. महत्त्वाच्या कामासाठी आपल्याला प्रवास करावा लागण्याची शक्यता आहे.

कन्या
कन्या

कन्या : आर्थिक आवक चांगली राहणार आहे. चैनीच्या वस्तूंच्या खरेदीसाठी पैसे खर्च होतील. मन अस्वस्थ राहणार आहे.

तुळ
तुळ

तूळ : आज आपण आनंदी आणि उत्साही राहणार आहात. नवीन नवीन कामे समोर दिसतील. पण त्या कामांना प्राधान्य द्यायला आपल्याकडे वेळ नसेल.

वृश्चिक
वृश्चिक

वृश्चिक : आपल्याला आपले मन प्रसन्न ठेवणे फार आवश्यक आहे. वाहन चालवताना वेगावर मर्यादा ठेवणे आवश्यक आहे.

धनु
धनु

धनु : आर्थिक आवक चांगली राहणार आहे. व्यवसायातून चांगले फायदे मिळतील. व्यवसाय आणि नोकरीमध्ये चांगले वातावरण आहे.

मकर
मकर

मकर : कामकाजात प्रगती होणार आहे. गृहसौख्यात वाढ होईल. जीवनसाथीशी नाते चांगले असेल. तुमच्या मर्जीनुसार वागाल. नोकरीमध्ये चांगली प्रगती होईल.

कुंभ
कुंभ

कुंभ : देवदर्शन, पर्यटन या निमित्ताने प्रवास होतील. प्रवासात मन आनंदी राहणार आहे. अनेक चांगल्या घटना घडतील. आर्थिक बाजू चांगली असणार आहे.

मीन
मीन

मीन : आजचा दिवस आपणास सामान्य जाणार आहे. मेहनत घेतली तरच कामे होणार आहेत. आर्थिक बाजू चांगली असणार आहे.

– ज्यो. मंगेश महाडिक

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news