द़ृष्टिदोष टाळण्यासाठी…

द़ृष्टिदोष टाळण्यासाठी…

डोळ्यांच्या आसपासचे स्नायू मजबूत असतील तर डोळ्यांची दृष्टी वाढते अथवा सुधारते. डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि 'अ' जीवनसत्त्वयुक्त आहारही गरजेचा आहे. तसेच नियमित नस्य केल्यामुळेही दृष्टी चांगली राहण्यास मदत होते.

वयाया ठराविक टप्प्यानंतर डोळ्यांची द़ृष्टी आपोआप कमी होते. डोळ्यांच्या आसपासचे स्नायू आपला लवचिकपणा घालवतात आणि कडक बनतात. मात्र, डोळ्यांच्या आसपासचे स्नायू मजबूत असतील तर डोळ्यांची द़ृष्टी वाढते अथवा सुधारते. डोळे आणि मेंदूच्या मध्ये एक खोल संबंध असतो. मेंदूची 40 टक्के क्षमता द़ृष्टीवर अवलंबून असते. आपण डोळे बंद करतो तेव्हा मेंदूला आपोआपच आराम मिळतो. जगातील एकूण लोकसंख्येच्या 35 टक्के लोकांना जवळचा आणि दूरचा द़ृष्टिदोष आहे. यामुळे हे लोक जाड चष्म्यांचा वापरही करतात. मात्र, चष्म्याच्या वापरामुळे द़ृष्टी वाढवता येऊ शकत नाही. योगा करून डोळ्यांची क्षमता कायम राखता येऊ शकते. त्यासाठी दैनंदिन काम करताना काही गोष्टी लक्षात घ्याव्यात.

मान सरळ ठेवून डोळ्यांची बुब्बुळे प्रथम चार ते सहा वेळा वर-खाली आणि नंतर डाव्या व उजव्या बाजूला फिरवावीत. त्यानंतर चार ते सहा वेळा डाव्या-उजव्या बाजूने गोलाकार घड्याळाच्या काट्याप्रमाणे आणि नंतर विरुद्ध दिशेने फिरवावीत. डोळे फिरविताना हाताच्या पंजाच्या मध्य भागाने डोळे काही वेळ झाकून ठेवावेत. यामुळे डोळ्यांचे स्नायू मजबूत राहतात. संगणकावर काम करताना दर दहा मिनिटांनंतर कमीत कमी 20 फूट दूरवर जरूर बघावे. यामुळे दूरद़ृष्टी कायम राहण्यास मदत मिळते. डोळ्यांसाठी काही योगासने उपयुक्त ठरतात. त्यापैकी एक म्हणजे सर्वांगासन.

ही क्रिया करण्यासाठी सर्वप्रथम शवासनात झोपावे. दोन्ही हात मांड्यांच्या खाली घालून जमिनीवर ठेवावेत. पाय गुडघ्यात वाकवून नंतर सरळ करावेत आणि पाठ खांद्यापासून वर उचलावी. दोन्ही हात कमरेखाली ठेवून शरीराच्या उंच केलेल्या भागाला आधार द्यावा. अशाच स्थितीत हनुवटी छातीला लावावी. श्वास रोखू नये. यानंतर पाय पुन्हा गुडघ्यामध्ये वाकवावेत आणि डोक्याकडे आणावेत. हात जमिनीवर सरळ ठेवत शरीर आणि पाय हळूहळू शवासनात आणावे. आसन करताना डोळे नेहमी उघडे ठेवावेत. हे आसन केल्यामुळे द़ृष्टी सुधारण्यास मदत होते. क्रोध आणि चिडचिडेपणा नाहीसा होतो. मुलांच्या मेंदूसाठी हे आसन अतिशय उपयुक्त आहे. याखेरीज डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुरेशी झोप आणि अ जीवनसत्वयुक्त आहारही गरजेचा आहे.

हेही वाचा :  

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news