TMC Yusuf Pathan : टीम इंडियाचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू उतरणार ‘लोकसभे’च्‍या मैदानात

TMC Yusuf Pathan : टीम इंडियाचा ‘हा’ माजी क्रिकेटपटू उतरणार ‘लोकसभे’च्‍या मैदानात
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : तृणमूल काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठीआपल्या उमेदवारांची यादी आज जाहीर केली. टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लाेकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्‍यात आली आहे. (TMC Yusuf Pathan)

युसूफ पठाण काँग्रेसच्‍या अधीर रंजन चौधरींविराेधात निवडणूक लढविणार

ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसने (टीएमसी) पश्चिम बंगालमधील सर्व 42 जागांसाठी लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये भारताचा दिग्गज माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण याला बहरामपूर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीचे उमेदवारी जाहीर केली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी बहरमपूरमधून निवडणूक लढवत आहेत. यावेळी अधीर रंजनचा सामना बहरामपूरच्या युसूफ पठाणशी होणार आहे. बंगालच्या कृष्णनगर लोकसभा मतदारसंघातून टीएमसीने महुआ मोईत्रा यांना पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे. तर जगदीश चंद्र बसुनिया यांना कूचबिहार लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. (TMC Yusuf Pathan)

तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी लोकसभेच्या 42 जागांसाठी तृणमूल काँग्रेसच्या उमेदवारांची यादी जाहीर केली. तसेच आसनसोलमधून लोकसभा मतदारसंघात शत्रुघ्न सिन्हा यांना उमेदवारी देण्‍यात आली आहे.

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा ममता बॅनर्जी यांनी यापूर्वीच स्‍पष्‍ट केले हाेते.  आता आसाम आणि मेघालयमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे त्‍यांनी जाहीर केले. तसेच अखिलेश यादव यांच्‍या समाजवादी पार्टीशी युती करुन एका जागेवर निवडणूक लढवण्याची चर्चा सुरू असल्‍याचेही त्‍यांनी सांगितले.

तृणमुल कॉंग्रसने जाहीर केलेल्या उमेदवारांची यादी

  • कूच बिहार- जगदीश बसुनिया
  • अलीपुरद्वार- प्रकाशचिक बराई
  • जलपाईगुडी- निर्मल रॉय
  • दार्जिलिंग- गोपाल लामा
  • रायगंज – कृष्णा कल्याणी
  • बालूरघाट- बिप्लब मित्र
  • मालदा उत्तर- प्रसून बॅनर्जी
  • मालदा दक्षिण- शहनाज अली रहयान
  • जंगीपूर- खलीलुर रहमान
  • बेरहामपूर- युसूफ पठाण
  • कृष्णनगर- मोहुआ मोईत्रा
  • राणाघाट- मुकुटमोनी अधिकारी
  • बोंगाव- विश्वजित दास
  • बारासात- डॉ.काकली घोष दस्तीदार
  • डायमंड हार्बर- अभिषेक बॅनर्जी
  • जाधवपूर- सयानी घोष
  • हावडा- प्रसून बॅनर्जी
  • उलुबेरिया- सजदा अहमद
  • हुगळी- रचना बॅनर्जी
  • घाटाळ- दीपक अधिकारी
  • झारग्राम- कालीपद सोरेन
  • मेदिनीपूर- जून मलिया
  • पुरिलिया- शांतीराम महतो
  • बांकुरा- अरुप चक्रवर्ती
  • वर्धमान पश्चिम- डॉ. शर्मिला सरकार
  • दुर्गापूर- कीर्ती आझाद
  • आसनसोल- शत्रुघ्न सिन्हा
  • बोलपूर- असितकुमार मल
  • बीरभूम- शताब्दी रॉय
  • बिष्णुपूर- सुजाता खान
  • आरामबाग- मिताली बाग
  • कोलकाता दक्षिण- माला रॉय
  • बराकपूर-पार्थ भौमिक
  • कृष्णनगर- महुआ मोईत्रा
  • हुगळी- सुपरस्टार अभिनेत्री रचना बॅनर्जी
  • बशीरहाट- हाजी नुरुल इस्लाम
  • तमलूक- गायक देबंगशु भट्टाचार्जी

हेही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news