तिरुमला देवस्थानची मालमत्ता २.२६ लाख कोटी; ५ हजार ३०० काेटींचे १० टन साेने, १५,९३८ काेटी राेकड

तिरुमला देवस्थानची मालमत्ता २.२६ लाख कोटी; ५ हजार ३०० काेटींचे १० टन साेने, १५,९३८ काेटी राेकड
Published on
Updated on

हैदराबाद, वृत्तसंस्था : आंध्र प्रदेशातील तिरुमला तिरुपती देवस्थान संस्थानने प्रथमच मंदिराची एकूण संपत्ती जाहीर केली. त्यानुसार राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये संस्थानचे 5,300 कोटी रुपयांचे 10.3 टन सोने आणि 15,938 कोटी रोख जमा असल्याचे सांगण्यात आले आहे. मंदिराची एकूण मालमत्ता 2.26 लाख कोटी आहे.

ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी ए. व्ही. धर्मा रेड्डी यांनी सांगितले की, सध्याच्या ट्रस्ट बोर्डाने 2019 पासून आपली गुंतवणूक भक्कम करत नेली आहे. 2019 मध्ये अनेक बँकांमध्ये 13,025 कोटी रोकड होती. नंतर ती वाढून 15,938 कोटी झाली आहे. गेल्या तीन वर्षांत गुंतवणुकीत 2,900 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. तसेच संस्थानकडील सुवर्णसाठा दरवर्षी वाढत चालला आहे. अनेक भाविक प्रचंड प्रमाणात सोने आणि चांदी संस्थानला दान करतात. त्यामुळेच जगातील सर्वात श्रीमंत देवस्थान अशी तिरुपती देवस्थानची ओळख निर्माण झाली आहे.

ट्रस्टचे अध्यक्ष आणि बोर्ड यांनी आंध्र प्रदेश सरकारी सिक्युरिटीजवर निधी गुंतवल्याचे वृत्त मात्र संस्थानने फेटाळून लावले आहे. संस्थानने सांगितले की, अशाप्रकारे आम्ही गुंतवणूक केलेले नाही. उर्वरित निधी शेड्युल्ड बँकांमध्ये गुंतवला गेलेला आहे.

भक्तांना विनंती आहे की, त्यांनी अशा खोट्या प्रचारावर विश्वास ठेवू नये. बँकांमध्ये जमा केलेली रोख आणि सोन्याची गुंतवणूक अत्यंत पारदर्शक आणि योग्य पद्धतीने केली जाते, असेही संस्थानने स्पष्ट केले आहे.

एकूण 960 मालमत्ता

देणगीच्या बाबतीत जगातील सर्वात श्रीमंत मंदिर असा लौकिक तिरुमला तिरुपती मंदिराने प्राप्त केला आहे. मंदिराच्या परिसरात व आसपास विविध ठिकाणी 7 हजार 123 एकरांत पसरलेल्या एकूण 960 मालमत्ता आहेत. चांदीपासून ते मौल्यवान दगड, नाणी, कंपनीचे शेअर्स आणि मालमत्ता यांसारख्या वस्तूही येथे दान स्वरूपात अर्पण केल्या जातात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news