तिरुमला देवस्थानची एफडी यंदा ११६१ कोटींची!

तिरुमला देवस्थानची एफडी यंदा ११६१ कोटींची!
Published on
Updated on

तिरुमला : वृत्तसंस्था : जगातील सर्वांत श्रीमंत मंदिर असलेल्या तिरुमला तिरुपती देवस्थानने यंदा एक हजार १६१ कोटी रुपयांची एफडी केली आहे. गेल्या १२ वर्षांतील हा उच्चांक असून गेल्या १२ वर्षांपासून सातत्याने ५०० कोटी रुपये किंवा त्याहून अधिक रुपये एफडी म्हणून जमा करणारे हे पहिले हिंदू देवस्थान ठरले आहे. बँकांमधील ट्रस्टची एकूण एफडी १३,२८७ कोटी रुपयांवर पोहोचली आहे.
व्याजच १,६०० कोटी विविध बँकांतील मुदतठेवी आणि ट्रस्टमधील रोकड मिळून मंदिराचा बॅलन्स १८ हजार ८१७ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. आजवरच्या इतिहासातील ही सर्वांत मोठी रक्कम आहे. ट्रस्टला एफडीवर दरवर्षी जवळपास १,६०० कोटी रुपये व्याज मिळते.
सोने ११,३२९ किलो!
मंदिरात एक हजार ३१ किलो सोने नुकतेच जमा झाले आहे. यानंतर मंदिराचा बँकांमधील सोन्याचा साठाही ११ हजार ३२९ किलो झाला आहे.

• २०१२ मध्ये ट्रस्टची एफडी ४८२० कोटी रु.
• २०१३ मध्ये ६०८ कोटी रु.
• २०१४ मध्ये ९७० कोटी
• २०१५ मध्ये ९६१ कोटी
• २०१६ मध्ये ११५३ कोटी
• २०१७ मध्ये ७७४ कोटी
• २०१८ मध्ये ५०१ कोटी
• २०१९ मध्ये २८५ कोटी
• २०२० मध्ये ७५३ कोटी
• २०२१ मध्ये २७० कोटी
• २०२२ मध्ये २७४ कोटी
• २०२३ मध्ये ७५७ कोटी
• २०१३ ते २०२४ ट्रस्टमध्ये ८४६७ कोटी रुपये जमा झाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news