अन् टेक ऑफ करताच निखळले प्लेनचे चाक!

अन् टेक ऑफ करताच निखळले प्लेनचे चाक!
Published on
Updated on

सॅन फ्रान्सिस्को : विमान हवेत असताना कधी दरवाजा उघडतो तर कधी खिडकी उघडते, असे अनेकदा होते. आता विमानाचा असाच एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे, ज्यात विमानाने टेक ऑफ करताच त्याचा टायर निखळला. टायर निखळून खाली जमिनीवर कोसळले असल्याचे या व्हिडीओत दिसून येते आहे. ही धक्कादायक घटना अमेरिकेच्या सॅन फ्रान्सिस्कोमधील आहे. युनायटेड एअरलाइन्सचे बोईंग 777 विमान सॅन फ्रान्सिस्कोहून जपानला जात होते. विमानात 235 प्रवासी आणि 14 क्रू मेंबर्स होते.

टेकऑफनंतर काही सेकंदात विमानाच्या डाव्या बाजूच्या मुख्य लँडिंग गियर असेम्ब्लीतील सहा टायरपैकी एक टायर निखळला. आकाशातून जमिनीवर कोसळलेले हे चाक सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळावरील पार्किंग एरियामध्ये कारवर पडले आणि कारचेही मोठे नुकसान झाले. अखेर लॉस एंजेलिसमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले असून सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचे कंपनीने जाहीर केले. विमानाचे टायर वाहनांच्या टायर्सपेक्षा वेगळ्या पद्धतीने बनवले जातात.

याच्या टायर्समध्ये, अ‍ॅल्युमिनियम आणि स्टीलसारखे इतर अनेक पदार्थ देखील रबरमध्ये मिसळले जातात. कारच्या टायरपेक्षा विमानाच्या टायरमध्ये हवा 6 पट जास्त दाबाने भरलेली असते. म्हणूनच ते इतके वजन सहन करण्यास सक्षम असतात. विमानाच्या एका टायरने टेकऑफ आणि लँडिंग सुमारे 500 वेळा केले जाते. यानंतर पुढील 500 वेळा वापरण्यासाठी त्यावर एक ग्रीप बसवली जाते. अशाप्रकारे टायरवर एकूण सातवेळा ग्रीप बसवता येते. त्यानुसार एका टायरने सुमारे 3500 वेळा टेकऑफ आणि लँडिंग करता येते. त्यानंतर हे टायर काही उपयोगाचे नसून ते निवृत्त केले जातात. विमानाच्या टायरमध्ये सामान्य गॅसऐवजी नायट्रोजन गॅस भरला जातो. कारण नायट्रोजन गॅस इतर गॅसच्या तुलनेत कोरडा आणि हलका असतो. यावर तापमानाचा फारसा परिणाम होत नाही, असे जाणकारांचे मत आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news