Tiger Shroff : “गणपत” नंतर सिंघम अगेन, टायगर श्रॉफ नव्या अभिनयासाठी सज्ज

tiger shroff
tiger shroff

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलीवूडच्या जगात प्रत्येक फ्रायडेला चित्रपटाच आणि कलाकारच भवितव्य ठरतं. बॉक्स ऑफिसच्या इन्कमवर प्रत्येक कलाकार आणि चित्रपट यांची प्रतिमा ठरते. (Tiger Shroff ) जरी टायगर श्रॉफचा अलीकडील चित्रपट "गणपत" बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नसला तरी त्याच्या झोळीत सिंघम अगेन सारखा चित्रपट आहे. गणपतने फार अपेक्षित कमाई केली नाही. पण टायगरची कलाकारी ही बॉक्स ऑफिस पलिकडे आहे. (Tiger Shroff )

गणपत'ने १३ व्या दिवशी केवळ १० लाखांची कमाई केलीय. या चित्रपटात त्याच्यासोबत टायगर श्रॉफ-कृती सेनॉन मुख्य भूमिकेत आहे. चित्रपटाने केवळ १२.५९ कोटी रुपयांची कमाई केलीय. "हीरोपंती"सारख्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ६.८ कोटी कमावले होते. त्याचा हा धमाकेदार पहिला चित्रपट होता, ज्याने इंडस्ट्रीमध्ये त्याच्या कारकिर्दीची सुरुवात केली. 'बागी', 'बागी 2', आणि अॅक्शन-पॅक्ड 'वॉर' यांसारख्या त्यानंतरच्या चित्रपटांच्या माधय्मातून टायगर अधिक ठळक झाला.

" बागी 2′ ने 'बागी'च्या कलेक्शनपेक्षा दुप्पट कलेक्शन केलं होते. त्यावेळी २५ कोटी चा दमदार गल्ला जमावला होता. " वॉर"मध्ये हृतिक रोशनसोबत त्याने स्क्रीन शेअर केली होती आणि त्याने बॉक्स ऑफिसवर तब्बल ५३ कोटींची कमाई केली होती. "बागी 3 " ने सुरुवातीच्या काळात १७ कोटींची दमदार कमाई केलीय.

आता 'गणपत'ची ओपनिंग ४ कोटींनी झाली होती. जगन शक्ती दिग्दर्शित "बडे मियाँ छोटे मियाँ," "हिरो नंबर 1," मध्ये अक्षय कुमार सोबत तर सिद्धार्थ आनंद निर्मित रॅम्बो आणि रोहित शेट्टी यांच्यासाठी हैदराबादमध्ये टायगर त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी सज्ज होत आहे. तो "सिंघम अगेन" मध्येही दिसणार आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news