Tiger 3 Screening सकाळी 7 वाजल्यापासून, ५ पासून बुकिंग

टायगर 3
टायगर 3
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : यशराज फिल्म्स या सणासुदीच्या हंगामात वायआरएफ स्पाय युनिव्हर्स चित्रपट, टायगर ३ चे स्क्रिनिंग (Tiger 3 Screening) करण्यास सज्ज आहे. सुपरस्टार सलमान खान आणि कॅटरिना कैफ स्टारर टायगर ३ दिवाळीच्या दिवशी, रविवारी, १२ नोव्हेंबर रोजी रिलीज होणार आहे! निर्मात्यांनी माहिती दिली आहे की, ते रिलीजच्या तारखेला देशभरात सकाळी ७ वाजल्यापासून चित्रपटाचे प्रदर्शन सुरू करतील! (Tiger 3 Screening)

संबंधित बातम्या –

तसेच, YRF ५ नोव्हेंबरपासून भारतात टायगर ३ चे आगाऊ बुकिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये प्रदर्शित होत आहे. टायगर ३ हा ब्लॉकबस्टर YRF स्पाय युनिव्हर्समधील 5 वा चित्रपट आहे. एक था टायगर, टायगर जिंदा है, वॉर आणि पठाण नंतर टायगर ३ येतोतय. याचे दिग्दर्शन मनीष शर्मा यांनी केले आहे.

YRF टायगर 3 हा YRF स्पाय युनिव्हर्स चित्रपटासाठी आतापर्यंतचा सर्वात विस्तृत रिलीज बनवण्याच्या मार्गावर आहे. हे हिंदी, तमिळ डब आणि तेलुगु डब वर्जनमध्ये रिलीज होईल. सकाळी ७ वाजल्यापासून टायगर ३ चे स्क्रिनिंग असणार आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news