करवीर तालुक्यात गॅस्ट्रोच्या साथीने तिघांचा मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष

करवीर तालुक्यात गॅस्ट्रोच्या साथीने तिघांचा मृत्यू, प्रशासनाचे दुर्लक्ष

करवीर; पुढारी वृत्तसेवा: करवीर तालुक्यातील दर्याचे वडगाव येथे गॅस्ट्रोच्या साथीने आतापर्यंत तिघा जणांचा मृत्यू झाला आहे. यामुळे गॅस्ट्रोची लागण झालेली ग्रामस्थ उपचारासाठी खाजगी तसेच सरकारी दवाखान्यात दाखल होत आहे. याच दरम्यान मात्र, ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामसेवक यांना अजूनही याबाबतचे गांभीर्य घेतले नसून दुर्लक्ष केलं आहे.

सदाशिव दिनकर कांबळे ( वय ६०) यांचा दुर्देवी मृत्यू झाला अजून किती बळी घेतला जाणार आहे? असा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे. गेल्या आठ ते दहा दिवसापासून गॅस्ट्रो साथीचा रोग परिसरातील ग्रामस्थांना जडला आहे. यात ५० ते ६० जण सध्या उपचार घेत असून काही जण उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर काही जणांवर अजूनही उपचार सुरू आहेत. तर आत्तापर्यंत तिघांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावर निर्माण झाले आहे.

स्वच्छ पाणी पुरवठा करणे, पाणीपुरवठा करणारे नळ लिकेज झाले आहेत की नाही हे तपासणे, पाण्यात टाकण्यात येणारी केमिकल पावडरचा डोस झाला आहे की नाही?, याबाबत ग्रामपंचायत पदाधिकारी कोणतीच नियोजन करत नाहीत. अशी चर्चा परिसरांतील ग्रामस्थांमध्ये पसरली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news