पीएम मोदींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; २० स्लीपर सेल, २० किलो RDX तयार असल्याचा दावा

पीएम मोदींना पुन्हा जीवे मारण्याची धमकी; २० स्लीपर सेल, २० किलो RDX तयार असल्याचा दावा
Published on
Updated on

मुंबई; पुढारी ऑनलाईन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकीचा मेल आल्यानंतर गुप्तचर यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) मुंबई शाखेला पाठवलेल्या ईमेलमध्ये पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

ईमेलमध्ये म्हटले आहे की २० स्लीपर सेल आणि २० किलो आरडीएक्स आहे. पीएम मोदींच्या हत्येचा कट उघड होऊ नये म्हणून मी आत्महत्या करत असल्याचे ई-मेलरने लिहिले आहे. सुरक्षा एजन्सी पीएम मोदींच्या हत्येचा कट रचल्याबद्दल मिळालेल्या ई-मेलचा स्रोत काय आहे याची माहिती गोळा करत आहेत.

ईमेलनुसार हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. मेलमध्ये असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवाद्यांशी संबंध आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने गुप्तचर आणि सुरक्षा यंत्रणांना धमकीचे ई-मेल पाठवले आहेत. ज्या मेल आयडीवरून मेल आला आहे त्याची सखोल छाननी सुरू आहे.

पंतप्रधानांसह लाखो लोकांचे नुकसान करण्यास तयार असल्याचे धमकीच्या ईमेलमध्ये लिहिले आहे. ईमेलमध्ये म्हटले आहे की, मी काही दहशतवाद्यांना भेटलो आहे, ते मला आरडीएक्समध्ये मदत करतील, मला आनंद आहे की मला बॉम्ब अगदी सहज मिळाले आणि आता मी सर्वत्र स्फोट करेन, मी योजना आखली आहे, २० स्लीपर सेल सक्रिय केले जातील आणि लाखो लोक मारले जातील.

हे ही वाचलं का ?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news