मुंबईत दहशतवादी हल्ल्याची धमकी; एनआयएला आला धमकीचा कॉल

मुंबई
मुंबई

मुंबई ; पुढारी वृत्तसेवा मुंबईसह राज्यातील काही महत्वाच्या शहरात दहशतवादी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेला (एनआयए) आलेल्या एका मेलवर ही धमकी देण्यात आली आहे. धमकी देणारी व्यक्ती स्वतःला तालिबानी दहशतवादी संघटनेचा सदस्य असल्याचे सांगत आहे.

या धमकीच्या मेलमुळे एकच खळबळ उडाली असून, मुंबईसह राज्यातील सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या मेलची सत्यता तपासण्यात येत असून, हा मेल कुठून आला, कोणी पाठवला याचा तपास सुरू आहे.

मुंबई पोलीस तसेच राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडून हा तपास सुरू आहे. या धमकीच्या मेलनंतर मुंबईच्या नाकाबंदीत वाढ करण्यात आली आहे तर, रेल्वे स्थानके, मॉल तसेच, गर्दीच्या ठिकाणे आणि सागरी किनाऱ्यावरील सुरक्षादेखील वाढविण्यात आली आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news