गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 2.97 टक्के निकाल घटला असल्याचे दिसत आहे. परंतु गेल्या वर्षी विविध सवलती देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यंदाच्या निकालाची तुलना गेल्या वर्षीच्या निकालाशी न करता 2020 च्या निकालाशी करणे आवश्यक आहे. 2020 आणि 2023 मध्ये झालेली परीक्षा सारखीच होती. त्यामुळे 2020 च्या निकालाची 2023 च्या निकालाशी तुलना करता यंदा निकालात 0.59 टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्याचबरोबर मुलींच्या निकालात लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे.– शरद गोसावी, अध्यक्ष, राज्य मंडळ.