pfizer booster dose : फायझरचा बूस्टर डोस ओमायक्रॉनवर प्रभावी

pfizer booster dose
pfizer booster dose

जोहान्सबर्ग : वृत्तसंस्था : pfizer booster dose : ओमायक्रॉनविरोधात फायझरची लस कमी प्रभावी असली तरी या लसीचा बूस्टर डोस या व्हेरियंटपासून संरक्षण करू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे.

फायझर लसीवर अभ्यास करणार्‍या दक्षिण आफ्रिकेतील आफ्रिका हेल्थ रिसर्च इन्स्टिट्यूटने ही बाब स्पष्ट केली आहे.

फायझर लसीचे दोन्ही डोस घेतले होते आणि ज्यांना आधी संसर्ग झाला होता, अशा बहुतेक लोकांच्या प्रकरणांत ओमायक्रॉन व्हेरियंट निष्प्रभ ठरल्याचे या अभ्यासात समोर आले आहे.

pfizer booster dose : ओमायक्रॉन व्हेरियंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट

ओमायक्रॉन व्हेरियंटच्या न्यूट्रलायझेशनमध्ये मोठी घट दिसून आली आहे, जी आधीच्या कोव्हिड स्ट्रेनपेक्षा अधिक आहे, असे इन्स्टिट्यूटमधील प्रोफेसर अ‍ॅलेक्स सिगल यांनी यासंबंधीचे ट्विट करताना स्पष्ट केले आहे.

१८ वर्षांच्या किंवा त्यापेक्षा जास्त वयाच्या लोकांना बुस्टर डोस देणं आवश्यक आहे. कारण, हा बुस्टर डोस सध्या जगभरात अत्यंत वेगाने पसरत असणाऱ्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचा आणि संसर्गजन्य स्ट्रेनचा सामना करण्यास सक्षम असल्याचं दिसत आहे, असे यूएस सेंटर फाॅर डिसीस कंट्रोल एण्ड प्रिव्हेंशन (U.S CDC) यांनी सोमवारी सांगितले.

कोरोना लसीच्या बुस्टर डोससंदर्भात अमेरिकेच्या आरोग्य नियमकांनी फायझर आणि माॅडर्ना लसीच्या बुस्टर डोसचा कालावधी २ दोन महिन्यांनी आणि जाॅन्सन एण्ड जाॅन्सनच्या बुस्टर डोसची ६ महिन्यांनी वाढवला आहे.

पण, यापूर्वी U.S CDC ने बुस्टर डोस देणे थांबलेले होते.

सोमवारी U.S CDC चे संचालक रिचेल वाॅलेन्स्की म्हणाले की, "सध्या एजन्सी सावध भूमिका घेत आहे.

कारण, ओमायक्राॅनच्या उदयामुळे कोरोनाच्या लसीकरण आणि बुस्टर डोस यावर जास्त भर दिला जात आहे.

सूत्रांचा हवाला देत वाॅशिंग्टन पोस्टने असं सांगितलं आहे की, "१६ आणि १७ वयोगटातील मुलांच्या बुस्टर डोससाठी Pfizer आणि BioNTeck या कंपन्यांकडून अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाला अधिकृत माहिती देणं अपेक्षित आहे."

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news