Spices : हिवाळ्यात ‘हे’ मसाले खाल्‍ल्‍याने शरीर राहते ऊबदार

Spices : हिवाळ्यात ‘हे’ मसाले खाल्‍ल्‍याने शरीर राहते ऊबदार

नवी दिल्ली : सध्या देशातील अनेक राज्यांत थंडीचा जोर वाढला आहे. या थंडीच्या काळात गरम पदार्थांचे सेवन फायदेशीर ठरते. थंडीचे आगमन होताच अनेकांना आजारांना सामोरे जावे लागते. सर्दी, खोकला यासारख्या समस्या जाणवू लागतात. अशा परिस्थितीत थंडीपासून वाचण्यासाठी स्वयंपाकघरात वापरल्या जाणार्‍या गरम मसाल्यांचे सेवन केल्याने शरीर ऊबदार राहते आणि अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
चला… जाणून घेऊया ते कोणते मसाले आहेत, जे हिवाळ्यात खाणे आवश्यक आहे.

लवंग : लवंगेत उष्णता असते. त्यामुळे हिवाळ्यात लवंगेचे सेवन करणे फायदेशीर ठरते. हिवाळ्यात तुम्ही चहा आणि भाज्यांमध्ये लवंग टाकून वापरू शकता. याचे सेवन केल्याने आपले शरीर ऊबदार राहते आणि लवंगेतील सर्व पोषक तत्त्वांचा लाभही आपल्याला मिळतो.

तमालपत्र : तमालपत्र हा एक असा मसाला आहे, जो हिवाळ्यात खाल्ल्यास विशेष फायदे होतात. तमालपत्रात कॅल्शियम, लोह, व्हिटॅमिन ए, सी आणि ई मुबलक प्रमाणात आढळतात. हे सर्व पोषक घटक हिवाळ्यात आपले शरीर ऊबदार ठेवण्यास मदत करतात. तमालपत्रीची उष्ण प्रकृती रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करते. खोकला, सर्दी यांसारख्या समस्या दूर ठेवते. याशिवाय हाडांसाठी आणि दातांसाठीही फायदेशीर आहे.

काळी मिरी : काळी मिरी एक तिखट मसाला आहे, ज्याचा वापर हिवाळ्यात खूप फायदेशीर आहे. काळ्या मिरीमध्ये आढळणारे अँटिऑक्सिडंटस् आणि व्हिटॅमिन सी शरीराला आतून ऊबदार ठेवण्यास मदत करतात. याव्यतिरिक्त, काळी मिरी खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि सर्दी, खोकला आणि फ्लूसारख्या समस्यांपासून आराम मिळतो.

दालचिनी : राहते दालचिनीचा ऊबदार प्रभाव शरीराला आतून ऊबदार ठेवतो, ज्यामुळे हिवाळ्याच्या थंडीपासून आराम मिळतो. हे आपली प्रतिकार शक्ती वाढवते आणि त्वचेच्या संसर्गासारख्या समस्या दूर करण्यासाठीदेखील उपयुक्त आहे.

हळद : हळद हा एक असा मसाला आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, विशेषतः हिवाळ्यात. हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचे संयुग असते, जे सर्दी आणि खोकल्याची लक्षणे कमी करण्यास मदत करते. याशिवाय घसा खवखवणे आणि सूज कमी होते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news