नवा फोन घेताय? भारतात लाँच झाल्‍या स्मार्टफोन्सच्या ‘या’ सीरीज

नवा फोन घेताय? भारतात लाँच झाल्‍या स्मार्टफोन्सच्या ‘या’ सीरीज

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : ऑगस्‍ट महिन्याला सुरुवात होताच भारतात विविध कंपन्याकडून अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. स्मार्टफोन कंपन्या ग्राहकांसाठी नवनवीन फोन्स लाँच करत आहेत. काही कंपन्यानी भन्नाट फिचर्सचे फोन बाजारात आणले आहेत. यामध्ये Vivo Y78 plus, Redmi 12, आणि Oneplus Nord CE3 5G सारख्या अनेक स्मार्टफोनचा समावेश आहे.

स्मार्टफोन कंपन्यांनी अधिकृत यूट्युब चॅनेलवर लाँच इव्हेंटला दाखवले आहे. याच्या माध्यमातून फोनबाबतची सर्व माहिती देण्यात आली आहे. याचसोबत ऑफर आणि डिस्काउंटबद्दल ही माहिती देण्यात आली आहे. तसेच प्री-बुकिंगची सुविधा देखील सर्व कंपन्यांनी दिली आहे.

चला तर मग पाहूया या भन्नाट, नविन स्मार्टफोन्सविषयी…

ऑगस्‍ट महिन्याच्या सुरूवातीला काही कंपन्या आपला नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. यामध्ये OnePlus, Xiaomi, Vivo आदी कंपन्याचे मोबाईल लाँच करण्यात आले आहेत.
1. Xiaomi Redmi 12
2. OnePlus Nord CE3 5G
3.Vivo Y78 Plus
4. Infinix GT 10 Pro

Xiaomi Redmi 12

Xiaomi ने आज Redmi 12 5G स्मार्टफोन, Redmi Watch 3 Active आणि Xiaomi Smart TV X सीरीज लाँच केली आहे. आज दुपारी १२ वाजल्यापासून ग्राहकांना हा फोन खरेदी करता येणार आहे. प्रीमियम ग्लास डिझाइन, 50MP Al ट्रिपल कॅमेरा, 5000mAhबॅटरी, MediaTek Helio G88, 90Hz 6.79" FHD+ डिस्प्ले. एसजीएस लो ब्लू लाइट असे फिचर्स देण्यात आले आहेत.

OnePlus Nord CE3 5G

OnePlus Nord 3 आणि OnePlus Nord Buds 2R सोबत लॉन्च करण्यात आले होते. तर आता OnePlus Nord CE 3 या आठवड्यात विक्रीसाठी सज्ज आहे, तर आता देशात OnePlus Nord CE3 5G फोनचे अनावरण झाले आहे. यामध्ये स्नॅपड्रॅगन 782G SoC असून सोनी IMX890 सेन्सरसह 50MP कॅमेरा आहे. 80W SuperVOOC चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी आहे.

Infinix GT 10 Pro

Infinix GT 10 Pro मालिका ग्राहकांसाठी घेवून आली आहे. आकर्षक डिझाइनसह, हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 8050 चिपसेटद्वारे बनवण्यात आला आहे. यामध्से 108MP सेन्सर आहे, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

.हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news