Cholesterol : ‘या’ पदार्थांमध्ये असते कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता

Cholesterol : ‘या’ पदार्थांमध्ये असते कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता

नवी दिल्ली : शरीरातील कोलेस्टेरॉलचे उच्च प्रमाण हार्टअ‍ॅटॅक आणि स्ट्रोकचा धोका निर्माण करू शकते. त्यामुळे रक्तातील कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित करणे आवश्यक आहे. आपल्या स्वयंपाकघरातच असणारे काही पदार्थ कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी मदत करू शकतात. त्यांची ही माहिती…

लसूण : स्वयंपाकात याचा वापर जास्त प्रमाणात होतो. शरीरास हानिकारक असलेल्या रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलला नियंत्रित ठेवण्याचे काम लसूण करते. यासाठी दररोज 2 ते 3 लसणाच्या पाकळ्या जरूर खाव्यात.

अक्रोड : रोज सकाळी तुम्ही चार अक्रोड खाल्ल्याने वाहिन्यांमध्ये साठलेले कोलेस्टेरॉल वितळते आणि शरीरातील वाईट कोलेस्टेरॉल पुन्हा यकृतापर्यंत पाठवण्यास फायदेशीर ठरते.

मेथीचे पाणी : मेथीचे पाणी देखील कोलेस्टेरॉल कमी करण्यास फायदेशीर ठरते. मेथीत असे काही गुणधर्म आढळतात ज्यामुळे खराब कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करण्यास मदत होते. त्यामुळे रोज एक कप मेथीच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.

ओटस् : आहारात ओटस् असणं फायदेशीर आहे. ओटस् खाल्ल्याने कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रित राहते. यामध्ये ग्लूकोन नावाचा घटक असतो जो आतडे साफ करण्यास मदत करतो.

logo
Pudhari News
pudhari.news