गुलाबी गाभ्याचे पेरू खाल्ल्याने होतात ‘हे’ लाभ

गुलाबी गाभ्याचे पेरू खाल्ल्याने होतात ‘हे’ लाभ

नवी दिल्ली : फळांचे सेवन हे आरोग्यासाठी लाभदायकच असते. वेगवेगळ्या ऋतूंत मिळणारी अनेक फळे खावीत, असे आहारतज्ज्ञ सांगत असतात. गुलाबी गाभ्याचा पेरू हा बाजारात उपलब्ध असलेला पेरूचा एक प्रकार आहे. हे खाण्यास स्वादिष्ट तर असतातच; पण आरोग्यासाठीही लाभदायक असतात.

हा पेरू कॉलेस्टेरॉल कमी करण्यास मदत करतो. गुलाबी पेरूमधील व्हिटॅमिन सी रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. तसेच त्वचेचे संरक्षण करते. गुलाबी गाभ्याच्या पेरूमध्ये अँटिऑक्सिडंटस्, बीटा-कॅरोटिन आणि लाईकोपीन मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. गुलाबी पेरूमध्ये जास्त प्रमाणात पाणी, फायबर सामग्री तसेच इतर पोषक घटक असतात. त्यामुळे वजन कमी करण्यास हा उत्तम पर्याय ठरेल. यामधील कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि उच्च फायबर मधुमेहींसाठी एक चांगला पर्याय आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news