Salman Khan : ईदला सलमान भेटू शकणार नाही चाहत्यांना?

iffi
iffi

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड अभिनेता सलमान खानला ( Salman Khan ) तुरूगांतून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा मुख्य सहकारी गोल्‍डी बराडने धमकी दिल्यानंतर मुंबई पोलिसात खळबळ उडाली. यानंतर पोलिसांनी सलमानसह त्याच्या कुंटूबाच्या सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर सुरक्षा वाढविल्याने घराबाहेर चाहत्यांना मोठ्या प्रमाणात जमण्यास बंदी घातली आहे. यामुळे येत्या ईदला गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर कोणताही उत्सव किंवा गर्दी होणार नसल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सलमानच्या ( Salman Khan ) सुरक्षेच्या कारणास्तव मुंबई पोलिसांनी त्याच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर दररोज हजारोंच्या संख्येने जमणाऱ्या चाहत्यांच्या गर्दीला परवानगी न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सुरक्षेसाठी दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक (एपीआय) अधिकारी आणि ८-१० कॉन्स्टेबल गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर चोवीस तास तैनात करण्यात आले आहेत. घराबाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यास बंदी घातल्याने सलमान येत्या ईदला चाहत्यांना भेटू शकणार नाही. यामुळे आता दरवर्षीप्रमाणे ईदला गॅलेक्सी अपार्टमेंट्सच्या बाहेर कोणताही उत्सव होणार नाही, अशी शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान सलमानच्या पर्सनल असिस्टंटला मिळालेल्या धमकीच्या ईमेलच्या संदर्भात पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सलमानच्या जवळच्या नातेवाईकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलमान या धमकीला गांभीर्याने घेत नाही. तर त्याचे वडील सलीम खान यांची चिंता वाढली आहे. वडील सलीम खान आणि आई सलमा मुलाच्या सुरक्षेबाबत अस्वस्थ झाले असून त्याची रात्रीची झोप उडाल्याचे सांगण्यात येत आहे. तर सलमान कुटुंबियांच्या दबावामुळे घराच्या बाहेर पडत नसल्याचेही म्हटलं आहे.

काही दिवसांपूर्वी सलमानचा पर्सनल असिस्टंट जॉर्डी पटेल यांना धमकीचा ईमेल आला होता. हा ईमेल रोहित गर्गच्या नावावरून आला होता. ईमेल मिळाल्यानंतर सलमानचा मित्र प्रशांत गुंजाळकर याने वांद्रे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी लॉरेन्स बिश्नोईचा सुत्रधार गोल्‍डी बराड आणि रोहित गर्ग यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news