पुढारी ऑनलाईन डेस्क : देशातील कोरोना रुग्णसंख्येत लक्षणीय घट झाली आहे. मात्र काही राज्यांमधील वाढती रुग्णसंख्येमुळे पुन्हा एकदा काळजी वाढली आहे. त्यामुळे कोरोनाची चौथी लाट येणार अशी शक्यताही व्यक्त केली लागली आहे. मात्र देशात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाही, असे आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रो. मनींद्र अग्रवाल यांना स्पष्ट केले आहे. त्यांनी व्यक्त केलेल्या विश्वासमुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
मागील २४ तासांमध्ये देशभरात १ हजार २४७ नवे रुग्ण आढळले आहेत. एक दिवसाची तुलना करता रुग्णसंख्येत ४३
टक्के घट झाली आहे. सोमवारी २ हजार १८३ नवे रुग्ण आढळले होते. . सलग तिसर्या दिवशी ५०० हून अधिक नवे रुग्ण
आढळल्याने चिंता व्यक्त होत होती. त्यामुळे देशभरात चौथी लाट येणार का? अशी शक्यता व्यक्त होत होती.
कोरोनाची चौथी लाट येणार का? या प्रश्नावर आयआयटी कानपूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रो. मनींद्र अग्रवाल यांनी गणिताचे सूत्र मांडले आहे. त्यांनी आपल्या संशोधनात म्हटले आहे की, सध्या तरी कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता नाही. सध्या कोरोना विषाणूचे जुने म्यूटेंटच आपला प्रभाव दाखवत आहे. देशभरात मोठ्या प्रमाणावर झालेले लसीकरण आणि ९० टक्के नागरिकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. त्यामुळे चौथी लाट येण्याची शक्यता कमी आहे. मात्र प्रतिकार शक्ती कमी असणार्यांना कोरोना संसर्गाचा धोका अधिक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उत्तर प्रदेश प्रदेश सीमेवरील काही राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याची गंभीर दखल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी घेतली आहे. आता लखनौसह उत्तर प्रदेश, हरियाणा, राजस्थान राज्यांतील काही भागांचा समावेश असणार्या 'एनसीआर' मधील काही शहरांमध्ये मास्क वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
यासंदर्भात माहिती देताना मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, 'एनसीआर'मधील गौतमबुद्ध नगर, गाझियाबाद, हापुड, मेरठ बुलंदशहर, बागपत शहरासह लखनौमधये मास्कचा वापर सक्तीचा केला आहे. या शहरांमधील लसीकरण न झालेल्यांचा शोध घेवून त्यांचे लसीकरण केले जाईल