शरीरातील ‘या’ अवयवात अजिबात नसते रक्त!

शरीरातील ‘या’ अवयवात अजिबात नसते रक्त!

Published on

नवी दिल्ली : माणूस शहाणपणाचा मोठा आव आणत असला, तरी स्वतःच्याच शरीराविषयीची बरीच माहिती त्याला असत नाही. अर्थात डॉक्टर वगैरे लोकांना ती असणे साहजिकच आहे; पण सामान्य माणसाला ती नसते! माणूस रक्ताशिवाय जगू शकत नाही हे आपल्याला माहिती आहेच. शरीरातील सर्व अवयवांमध्ये रक्तसंचार होत असतो. मात्र, शरीरात एक अवयव असाही आहे ज्यामध्ये अजिबात रक्त नसते, हे तुम्हाला ठावूक आहे का? हा अवयव म्हणजे डोळ्यांचा कॉर्निया.

कॉर्निया हा डोळ्यांवरील एक थर असतो. हा थर इतका महत्त्वाचा असतो की, त्याशिवाय व्यक्ती काहीच पाहू शकत नाही. कॉर्नियामध्ये एकही रक्तवाहिनी नसते. यामध्ये नसांचे एक जाळे असते. आता या अवयवामध्ये रक्त नसते, तर तो कसा काम करतो, असाही प्रश्न आपल्याला पडू शकतो. तसेच या अवयवाचे पोषण कसे होते, असाही प्रश्न आहे. तर कॉर्नियाला पोषण देणारे फ्लुईड तिथेच असतात. त्याशिवाय या अवयवाला हवेतून ऑक्सीजनही मिळतो. कॉर्निया हा शरीरातील सर्वात महत्त्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याचे कारण म्हणजे याला काही इजा झाली, तर व्यक्तीची द़ृष्टी जाते. इतकेच नव्हे तर कॉर्नियाला गंभीर दुखापत झाली, तर व्यक्तीचा जीवही जाऊ शकतो.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news