घाऊक महागाई दर १०.७ टक्क्यांवर

घाऊक महागाई दर १०.७ टक्क्यांवर

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : खाद्यान्न श्रेणीतील वस्तू तसेच इंधनाचे दर काही प्रमाणात कमी झाल्याच्या पार्श्वभूमीवर सरत्या सप्टेंबर महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक ऑगस्टमधील १२.४१ टक्क्यांच्या तुलनेत १०.७ टक्क्यांवर आला आहे. सलग चौथ्या महिन्यात घाऊक महागाई निर्देशांक कमी झाला आहे. गतवर्षीच्या सप्टेंबरमध्ये हा दर ११.८० टक्के इतका होता.

चालू वर्षीच्या सुरुवातीला घाऊक महागाई निर्देशांक १५.८८ टक्क्यांच्या उच्चांकी स्तरावर गेला होता. तेव्हापासून या निर्देशांकात घट झाली असली तरी अजुनही हा निर्देशांक दहा टक्क्यांच्या वरच आहे. सरत्या महिन्यात खाद्यान्न श्रेणीचा निर्देशांक १२.३७ टक्क्यांच्या तुलनेत ११.०३ टक्के इतका नोंदवला गेला.

वार्षिक तत्वावर भाजीपाल्याच्या दरात मात्र, ३९.६६ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. इंधन आणि ऊर्जा क्षेत्राचा निर्देशांक ३३. ६७ टक्क्यांच्या तुलनेत ३२.६१ टक्के इतका नोंदवला गेला. घाऊक महागाई निर्देशांक बऱ्यापैकी खाली आलेला असला तरी किरकोळ महागाई दर मात्र, अजुनही चिंताजनक स्तरावर आहे. सरत्या महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक पाच महिन्यांच्या उच्चांकी स्तरावर म्हणजे, ७.४१ टक्क्यांवर गेला होता.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news