Urfi Javed Arrest : ‘माझी मर्जी…’; उर्फी जावेदला मुंबई पोलिसाकडून अटक! (video)

Urfi Javed Arrest
Urfi Javed Arrest

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. नेहमी उर्फीचा बोल्ड लूक आणि तिची अंतरंगी स्टाईल चर्चेत असते. आता उर्फी तिच्या अंतरंगी फॅशने नव्हे तर वेगळ्याच कारणाने चर्चेत आली आहे. उर्फी जावेदला मुंबई पोलिसांनी ताब्यात ( Urfi Javed Arrest ) घेतल्याचे माहिती समोर येत आहे. या घटनेचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

संबंधित बातम्या 

विरल भयानी इंन्टाग्रामवर व्हायरल झालेल्या व्हिडिओ उर्फीला दोन महिला पोलिस ताब्यात घेताना दिसत आहेत. यानंतर ते पोलिसाच्या गाडीतून तिला पोलिस स्टेशनला नेतानाही दिसतात. दरम्यान उर्फी एका नेटकॅफेच्या बाहेर येताच दोन पोलिस महिला तिच्याजवळ येतात आणि तिला छोटे-छोटे कपडे घालून रस्त्याने फिरतेस असे म्हणत चौकीवर नेतात.

यावेळी उर्फी त्यांना 'माझी मर्जी मी कोणतेही कपडे परिधान करेन' असे म्हणतेय. मात्र, पोलिस तिचे काहीही न ऐकताच तिला गाडीत बसवून पोलिस स्टेशनला नेतात. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मात्र, उर्फीला नेमकं कोणत्या कारणासाठी पोलिसांनी अटक केली आहे यांची अधिकृत्त माहिती समोर आलेली नाही.

दरम्यान उर्फीने यावेळी स्ट्रेट डेनिम जीन्स आणि ब्लॅकलेस रेड क्रॉप टॉप परिधान केला होता. याशिवाय मेकअप आणि कानात सोनेरी रंगाच्या इअररिंग्स परिधान केल्या आहेत. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच चाहत्यांनी भरभरून कॉमेन्टस केल्या आहेत. तर काही नेटकऱ्यांनी तिला पब्लिसिटी स्टंट करत असल्याचे म्हटले आहे. ( Urfi Javed Arrest )

(video : viralbhayani instagram वरून साभार)

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news