सासवड : पुढारी वृत्तसेवा : पुरंदर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची बांधणी मजबूतपणे करून गावातील बूथ, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदेचे वॉर्डप्रमाणे तालुका बूथ, विधानसभा, लोकसभा मतदारसंघातील बूथ कमिटी तयार करा. तसेच 'काँग्रेसमुक्त भारत' ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा आहे, ती सर्वत्र पोहचवून भाजप शहरासह, गाव, वस्ती, वाडीपर्यंत पोहचवण्याचे काम सर्वांना करायचे आहे. बारामती लोकसभेचा खासदार हा भाजपचाच असेल, असा विश्वास भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चा जिल्हा अध्यक्षा अंकिता पाटील यांनी व्यक्त केला आहे.
सासवड (ता.पुरंदर) येथे अजित नागरी पतसंस्था कार्यालयात भाजप युवा मोर्चा पुरंदर यांच्या वतीने बैठक घेण्यात आली या वेळी अंकिता पाटील बोलत होत्या, या वेळी युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष प्रिया पवार, प्रदेश सदस्य अनिकेत हरकुडे, प्रदेश उपाध्यक्ष व जिल्हा प्रभारी कुणाल टिळक, प्रदेश सचिव रौनक शेट्टी, जिल्हा सरचिटणीस वैभव सोलनकर, पुणे युवा मोर्चाचे उपाध्यक्ष साकेत जगताप, पुणे युवा मोर्चाचे सरचिटणीस अजिंक्य टेकवडे, जिल्हा चिटणीस विठ्ठल जगताप, विधानसभा प्रमुख मयूर फडतरे, तालुकाध्यक्ष संतोष जगताप, उपाध्यक्ष भानुकाका जगताप आदी उपस्थित होते. कुणाल टिळक म्हणाले, पुरंदर तालुक्यात संघटित होऊन सर्वांनी एकत्र काम करायचे आहे. कोणीही नाराज न होता. पक्ष संघटन वाढवायचे आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गट बांधणी करावी. या वेळी अध्यक्ष दिलीप कटके, अमोल जगताप, प्रतीक म्हेत्रे, सचिन हांडे, डॉ. बाबासाहेब हरपळे, संदीप देवकर, गणेश भोसले, स्वप्नील मोडक, नितीन ताकवले, गोरख मेमाणे, संदीप कटके, संदीप हरपळे आदी उपस्थित होते.
हेही वाचा :